कारणीभूत होतें. राजा होऊन आलेला इसम कारण नसतां खासगी रीतीनें जर जवळ उभा राहिलेल्या शिपायाबरोबर किंवा दुस-या एखाद्या इसमाबरोबर काय पाहिजे तें बोलू लागला किंवा त्याच्याशीं गफ्फा मारूं लागला-मग त्या कितीही हळू असोत-तर लोकांचें लक्ष तिकडे वेधून नाटकास रंग भरला असेल तर तो कमी होतो.
(८) कित्येक पात्रांना रंगभूमीवर आल्याचें जणूं काय भान न राहून तीं चोळवटलेली चादर साफ करणें, मोठा झालेला दिवा कमी करणें अशों कामें करतात. त्यामुळे विलक्षण प्रकारचा विरस उत्पन्न होतो. करितां अशा प्रकारचा विरस उत्पन्न न होऊं देण्याबद्दल पात्रांनी खबरदारी घेतली पाहिजे.
(९) अलीकडे कित्येक नाटककंपन्यांत स्त्रियांची भूमिका घेणा-या पात्रांचे केस उलटे करण्याची प्रवृति पडली आहे. सोईच्या दृष्टीनें कदाचित त्यापासून फायदा असेल, पण त्यायोगानें नाटकाचा विरस होतो एवढी गोष्ट खरी आहे. हे केस अशा रीतीनें उलटे फिरविलेले असतात कीं, ते हुबेहुब कसविणीच्या केसाप्रमाणें दिसतात; व पात्रानें कुलिन स्त्रीचा वेष घेतला असेल तर स्वाभाविक मोहकपणा, लज्जा वगेरेंनीं जो ठसा उमटावयाचा तो अशा उलट्या केसाच्या नख-यानें उमटत नाहीं. "वाशिमकर,” “पाटणकर,” “स्वदेशहितचिंतक"
पान:मराठी रंगभुमी.djvu/226
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१९२
मराठी रंगभूमि.