पान:मराठी रंगभुमी.djvu/227

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१९३
भाग ३ रा.


वगैरे नाटककंपन्यांतून हा प्रकार फार होत असतो; व वाशिमकरांच्या बाजीराव आणि मस्तानी खेळांत पुरंदू ची स्त्री अशा प्रकारची सजलेली पाहून पुष्कळ मार्मिक प्रेक्षकांनीं आपला तिटकारा व्यक्त केल्याचें आह्मांस माहित आहे.
 ( १० ) दररोज नाटकें लावण्यानेंही नाटकाचा विरस होतो. पुष्कळ नाटककंपन्या प्राप्तीच्या आशेनें एक दिवस अड किंवा दररोजही नाटक लावितात; पण दररोज नाटक लावण्यानें पात्रं दमून जाऊन त्यांच्या हातून योग्य काम होत नाहीं; एवढेच नव्हें तर, सतेज असलेले इसम निःस्तेज होऊन त्यांचें रंगभूमीवर चांगलें सोंग दिसत नाहीं. नाटकाची मदार पुष्कळ वेळां उमद्या पात्रांवर अवलंबून असते. पण रोजच्या जाग्रणानें आणि श्रमानें हा उमदेपणा नाहींसा होती. संगीत नाटकें एका अर्थी दररोज केली तर चालतील; कारण मनोरंजन हाच त्यांचा मुख्य उद्देश असून गाणा-या पात्रांचा आवाज मेहनतीनें विशेष खुलण्यासारखाही असतो. पण बुकेश नाटकांचें असें नाहीं त्यांत भाषण व अभिनय यांनीं लोकांस बोध द्यावयाचा असल्यामुळे त्याकरितां पात्रांस मेहनत करावी लागत व अशी मेहनत दररोज जर पात्रं करूं लागतील तर त्यांच्या हातून तें काम नीटपणें होणार नाहीं. त्यांतून कित्येक कामें तर अशीं बिकट आणि श्रमदायक असतात कीं, तीं केलीं असतां