मेकांविषयी शुध्द असतील तरच त्यांची तादात्म्यवृत्ति होईल. कपट, द्वेष, तिरस्कार, सूड उगविण्याची बुद्धि इत्यादिकांचें प्रदर्शन करते वेळीं अशा स्वाभाविक वृत्तीचा थोडा बहुत उपयोग होईल; नाहीं असें नाहीं. तथापि पहिल्या गोष्टींत चुकून माकून जरी अतिरेक झाला तरी त्याचा अनिष्ट परिणाम होण्याची भीति नाहीं, तसें दुस-या गोष्टींत नसल्यामुळे त्याचा अनिष्ट परिणाम होण्याचा संभव आहे; व पूर्वी कोणत्याशा एका पौराणिक नाटककंपनीत नृसिंह अवतार धारण केल्यावर एका पात्रानें हिरण्यकश्यपूच्या पोटांत नखे खुपसून त्याला ठार मारल्याचें जें उदाहरण आहे तें अशाच अतिरेकाचें द्योतक असावें असें आह्मांस वाटतें. आतां मूळचा द्वेषमूलक स्वभाव नसल्यामुळे दुष्ट कृतीचे वेळीं कृत्रिम उपायांनीं अथवा अभ्यासानें जशी रंगभूमीवर तादात्म्यवृत्ति आणतां येते तशी मूळचा सुस्वभाव नसल्यास सुकृतीचे वेळीं कृत्रिम उपायांनीं अथवा अभ्यासानें तशी तादात्म्यवृत्ती आणणें कठिण आहे. हा नियम खरा आहे कीं खोटा आहे हें मनुष्याच्या प्रत्यक्ष व ख-या व्यवहारावरून व अनुभवावरून ताडतां येण्यासारखे आहे. ख-या जगांत प्रेम, सद्रुष्ण अथवा सत्ववृात हीं प्रगट होण्यास जसे सायास पडतात तसे कपट, दुर्गुण व तामसवृत्ती हीं प्रगट होण्यास पडत
नाहीत; किंबहुना दुष्टपणा व तामसवृत्ती हींच हरएक
पान:मराठी रंगभुमी.djvu/229
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१९५
भाग ३ रा.