तेथील संस्थानिक श्री. चिंतामणराव आप्पासाहेब यांनीं करविले. या वेळीं कर्नाटकांत कृष्णपारिजात वगैरे खेळ कानडी भाषेत होत असत, तशाच धर्तीवर हा खेळ होता. या खेळांत पात्रे पुढें येऊन गावून नाचत असत, व थोडेबहुत भाषण करून त्यांत प्रेक्षकांना रिझवीत असत. यांतील सर्व पात्रांना चांगलें गावयास येत होतें असें नाही; पण सगळ्यांनीं गायलें पाहिजे अशी त्या खेळाची साधारण पद्धत होती. या खेळांतील पात्रांचे वेष खराबच असत; व भाषण संगतवार नसल्यामुळे साधारणपणें त्यापासून गांवढळ लोकांचेंच मन रिझे, विद्वानांना बहुधा त्याचा कंटाळाच येई. कर्नाटक प्रांतांत जसे हे खेळ होत असत तसेंच गुजराथ, मारवाड, उत्तर हिंदुस्थान वगैरे भागांतही हिंदुस्थानी व गुजराथी भाषत होत असत; व राधाकृष्ण वगैरेंचीं सोंगें घेऊन गात नाचत पात्रे प्रेक्षकाचें मनोरंजन करीत. त्यांत पद्धत, ठाकठीकपणा, अभिनय, संगतवार भाषण वगैरेंचा अभावच होता. वर सांगितलेल्या भागवत मंडळीचे दोन तीन प्रयोग पाहिल्यावर श्री. चिंतामणराव आप्पासाहेब यांच्या मनांत अशा प्रकारच्या प्रयोगांत सुधारणा करून ते. मराठींत झाले तर फार चांगलें होईल असें वाटून त्यांनीं आपले आश्रित रा. विष्णुपंत भावे यांस ' तुह्मी असले प्रयोग करून दाखवाल काय ! ' म्हणून विचारलें. या वेळीं रा. भावे हे श्री. आप्पासाहेब यांच्या खासगी-
पान:मराठी रंगभुमी.djvu/23
हे पान प्रमाणित केलेले आहे.
९
भाग १ ला