पान:मराठी रंगभुमी.djvu/32

हे पान प्रमाणित केलेले आहे.
१८
मराठी रंगभूमि.

व पुष्कळ झोंड लोकांना फुकट खेळ पहावयास मिळे. भावे यांचे कांहीं खेळ पुण्यास झाल्यावर त्यांची व तेथील मोठ्या लोकांची लवकरच ओळख झाली: व रा. केरो लक्ष्मण छत्रे, कृष्णशास्त्री चिपळूणकर, केशवराव भोवळकर वगैरे गृहस्थांनी त्यांस चांगली मदत केली. पुण्याहून रा. भावे हे नाटक घेऊन पुढे मुंबईस गेले. तेथेंही आतांप्रमाणे त्यावेळी नाटकगृहे फार नव्हती. इंग्रजी अंमल सुरू झाल्यानंतर कांहीं यूरोपियन खेळवाल्या कंपन्या इकडे येऊ लागल्या होत्या. त्यांपैकी एका कंपनीने मुंबईस ग्रांटरोडवर नाना शंकरशेट यांच्यापाशी जागा मागून घेऊन एक नाटकगृह बांधले होते; व त्यांत त्यांचे प्रयोग होत असत. *हे नाटकगृह बहुधा रिकामें नसे व त्याचे भाडेही फार असे. त्यामुळे भावे यांना या नाटकगृहाचा नाद सोडून देऊन दुसरी तजवीज पहावी लागली. इतर कंपन्या मुंबईस आल्या ह्मणजे त्यांचे खेळ बहुधा झावबाच्या वाडीत किंवा फणसवाडीतील विठ्ठल सखाराम आग्निहोत्री यांच्या जागेत होत असत. यांपैकींच एक जागा भावे यांनी मागून घेऊन त्यांत मंडप घातला व खेळास प्रारंभ केला. मुंबईस यांच्या खेळास आरंभी दीड दोनशे रुपये मिळत असत; व एकदां


 *या नाटकगृहाचें नांव 'बादशाही थिएटर' असें होतें. हें थिएटर त्या कंपनीने इमारतीसह पुढे नाना शंकरशेट यांस बक्षिस दिलें. हल्ली तें पडून त्या जागी एक गिरणी उभारली आहे.