पान:मराठी रंगभुमी.djvu/47

हे पान प्रमाणित केलेले आहे.
३१
भाग १ ला.

 राक्षसाच्या कामांत जसा उग्रपणा असे तसा देवाच्या कामांत सौम्यपणा असे; व त्यांची सोंगें रंगवीत तीही सौम्यपणा दिसेल अशाच रीतीने रंगवीत. या सोंगाच्या कपाळावर बहुधा सफेतीच्या मुद्रा मारून डोकीचे केस खांद्यावरून दोहों बाजूला पुढे टाकीत, व गळ्यांत बेगडीचे दागिने असून दोन्ही बाजूस दोन भुजा व डोकीवर मोराची पिसें व बेगड लाविलेला किरीट घालीत. हा वेष घेणारे लोक थोडे बोलके असत, व भाषण करतांना ते पूर्वीच्या शास्त्रीपंडितांप्रमाणे मधून मधून संस्कृत शब्द व लांब लांब वाक्ये घालीत. देवांची सोंगे करणारे जे कांहीं इसम नावाजण्यासारखे होऊन गेले त्यांत कोल्हापरकर व इचलकरंजीकर यांच्या नाटकांत बरेच होऊन गेले. जुन्या नाटकांत तीन साडेतीन त काढलेल्या एका इसमाशीं भाषण चालले असतां त्याने आह्मांस असे सांगितले की, " देवांची सोंगें कोल्हापुरकरांनी करावी; स्त्रियांची सोंगे सांगलीकरांनी करावी; व राक्षसांची सोंगें पुणेकरांनी करावी."
 इतर सोंगांसंबंधाने काही विशेष गोष्टी आहेत त्या अशाः-गणपती तांबडा पाहिजे अशी सर्वसाधारण समजूत असल्यामुळे त्याचा पोषाख तांबड्या रंगांत रंगविलेला असून सोंड जी लावीत तीही तांबडीच लावीत. ही सोंड कागदाची असून पोकळ असे; पण आंत हवा जाण्यास मार्ग नसल्यामुळे प्रसंगविशेषीं तें