पान:मराठी रंगभुमी.djvu/49

हे पान प्रमाणित केलेले आहे.
३३
भाग १ ला.

रंगभमीवरून पळवीत व उड्या टाकवीत नेत! अशा प्रकारें अतुल शक्ती, पराक्रम, वेग इत्यादिकांचे रंग- भूमीवर प्रदर्शन होऊन ही बलभीमाची स्वारी आंत गेली की, श्रमामुळे तिला केव्हां एकदां जमीन गांठीन असें होऊन जाई! रावणाची तडफ तर याहून जास्त जोराची असे. ही स्वारी कागदाची आठ व खरें एक अशी नऊ तोंडे लावून व खरे दोन आणि कागदाचे अठरा असे वीस हात घेऊन तरवारीच्या फेंका करीत राळेच्या सरबत्तीत रंगभूमीवर येत असे, व आरडाओरड करून नाटकगृह दणाणून सोडीत असे. नारदाचे सोंग बहुधा लहान इसमास देत; व त्याची शेंडी, कपाळावरील मुद्रा व नाचत येण्याचा थाट यांत कधीं अंतर पडू देत नसत.
 असो; रा. भावे यांच्या पाठीमागून लगेच ज्या पौराणिक नाटके करणा-या कंपन्या निघाल्या त्यांची हकीकत वर सांगितल्याप्रमाणे आहे. यानंतर उंब्रजकर, पुणेकर, अमळनेरकर, वगैरे कपन्या निघाल्या व त्याही वरील नाटके कांही दिवस करीत असत. या सर्व कंपन्यांत रा. भावे यांच्या कंपनीपेक्षां पडदे * आधिक; देखाव्याच्या सामानाची व वेषाची थोडीबहुत जोडणी;


 * कोल्हापुरकर नरहरबुवा हे कंपनी घेऊन १८७५ च्या सुमा- रास हैद्राबाद येथे गेले. त्यावेळी त्यांनी पारशी कंपनीचे खेळ पाहन नतर आपल्या खेळांत ५।६ पडदे तयार केले; व तेव्हांपासन पडद्यास सुरवात झाली.