पान:मराठी रंगभुमी.djvu/50

हे पान प्रमाणित केलेले आहे.
३४
मराठी रंगभूमि.

तिकिटें,हस्तपत्रकें व जाहिराती काढणें ;रात्रभर खेळ न करितां कांहीं नियमित वेळपर्यंत खेळ करणे; वगैरे कांहीं सुधारणा झाल्या; बाकी प्रयोगाची पद्धत एकच होती.

नाटकाचा धंदा हलकट का झाला?

 आमच्या लोकांची साधारण अशी रीत आहे की, एकाने एखादा नवा उद्योग अगर धंदा काढला आणि त्यांत तो चार दोन पैसे मिळवू लागला की, त्याचे नुसतें अनुकरण करून पैशाच्या आशेने दुसऱ्यांनी लगेच तो धंदा काढावयाचा. यायोगानें असें होतें कीं, मळ धंदा काढणाऱ्याची प्राप्ति बुडून त्याचा धंदाही नीट चाले- नामा होतो; मग त्यांत सुधारणा वगैरे होण्याचें दूरच राहिले. हाच नियम त्यावेळी ज्या नाटकमंडळ्या अस्ति- त्वांत आल्या होत्या त्यांस लागू पडतो. रा. भावे यांनीं पाहिले नाटक केल्यापासून पुढे वीस वर्षांत ह्मणजे १८४२ पासून १८६२ पर्यंत सरासरी दहा बारा कंपन्या होत्या. पण पुढें पांच दहा वर्षांत कंपन्यावर कंपन्या अस्तित्वांत आल्यामुळे नाटकाच्या धंद्यास तेजी न येतां उलट तो खालावत गेला. याचे कारण एक तर उघडच आहे की, अशा कंपन्या फार झाल्या. दुसरें असें की, ज्याला पोटास कांही मिळत नव्हते त्याने उठावें तें नाटकांत शिरावें. असें झाल्यामुळे अडाणी व अशिक्षित लोकांच्या हातांत तो धंदा जाऊन त्याचे वाटोळें झाले. यावरून पहिल्या पहिल्या नाटकांत अशिक्षित