कलेची अनेक अंगेंउपांगें दृष्टीस पडल्यावर नवीन विद्या शिकलेल्या आमच्यांतील कित्येक विद्वानांचे तिकडे लक्ष वेधलें, व त्याचे अनुकरणही ते करूं लागले. याच सुमा- रास शाकुंतलादि संस्कृत नाटकांची इंग्रजी भाषेत भाषां- तरे होऊन युरोपियन लोकांचे लक्ष आमच्या प्राचीन विद्येकडे लागले होते; व आमचे प्राचीन रीतिरिवाज, आचारविचार, स्थिति वगैरे समजून घेण्याकडे त्यांचीही प्रवृत्ति झाली होती. इंग्रजी भाषेतील नाटकप्रयोगांची आमच्यांतील कित्येक विद्वानांस जशी गोडी लागली होती तशीच विद्या शिकविण्याकरितां तिकडून इकडे आलेले कित्येक आंग्लगुरु व इतर गृहस्थ यांनाही आमच्यांतील संस्कृत नाटकांचे प्रयोग पाहण्याची गोडी लागली होती; व ठिकठिकाणच्या कॉलेजांतून अशा प्रकारचे प्रयोगही होऊ लागले होते. मुंबईस "कालिदास एल्फिन्स्टन सोसायटी" या नांवाची एक मंडळी निघाला होती. तींत नवी विद्या शिकलेले इकडील बरेच लोक होते. या मंडळीने शाकंतल नाटकाचा प्रयोग इंग्रजीत केला. त्यांत फक्त भाषणे इंग्रजीत होतीं, बाकी पोषाखाची वगैरे सर्व तन्हा आमच्याकडीलच होती. या नाटकाच्या प्रयोगासंबंधाने असे सांगतात की, पूर्वीच्या वेळच्या स्थितीचें हुबेहुब चित्र वठविण्याकरितां ज्या ज्या देखा- व्यांची जरूर होती व जे जे जिन्नस पाहिजे होते ते ते अतोनात पैसे खर्च करून आणले होते. शकुंतलेस
पान:मराठी रंगभुमी.djvu/56
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४०
मराठी रंगभूमि.