वल्कलें नेसावयास पाहिजे होतीं तीं ४०० रुपये खर्च करून मुद्दाम मद्रासहून आणलीं होती; व पुष्पशय्येकरितां पुण्याहून फुलांच्या दोन वेंगन्स भरून नेल्या होत्या!
नाट्यकलेकडे मुंबईतील नव्या सुशिक्षित विद्वानांचें व कलेिजांतील प्रौढ़ विद्याथ्र्याचें जसे लक्ष लागलें होतें तसेंच पुण्यांतील लोकांचें व विद्यार्थ्यांचेंही लागलें होतें; व विद्यार्थ्यांना इंग्रजी नाटकांचें रहस्य समजून देण्याकरितां कॉलेजांत कांहीं युरोपियन नटही मुद्दाम बोलावीत असत. अशा त-हेचे ' मिस एल्शिया मे ' व " प्लेअर ल्को ” या नांवाच्या दोन नटांस एकदां डेकन कॉलेजमध्यें बोलावून व त्यांना ५०० रुपये देऊन त्यांच्याकडून कांहीं नाटकें वाचून घेतलीं होती असें सांगतात. पुण्यांत इ. स. १८७२ च्या सुमारास विश्रामबाग हायस्कूलच्या चौकांत त्या शाळेतील विद्यार्थ्यांनीं ' जुलिअस सीझर ' नामक नाटकाचा प्रयोग इंग्रजोंत पहिल्यानें केला. या नाटकाच्या प्रयोगास प्रयेाग ह्मणण्यापेक्षां रेसिटेशन ह्मणणेंच सयुक्तिक होईल. कारण, विद्यार्थ्यांनीं तोंडाला रंग न लावितां किंवा वेष न बदलतां टोप्या व गाऊन (झगे) घालूनच आपापलीं भाषणें तोंडानें हाटलीं होतीं.हींच भाषणें त्यांनीं पुन्हां एकदां खासगी रीतीनें एका वाडयांत म्हणून दाखविलीं. यानंतूर रा. बाबा गोखले यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनीं ' मर्चट ऑफ् व्हेनिस ' या शेक्सपीयरच्या नाटकाचा
पान:मराठी रंगभुमी.djvu/57
हे पान प्रमाणित केलेले आहे.
४१
भाग १ ला.