सुधारली. आजपर्यंत कोणत्याही कॉलेजच्या मंडळीनें मराठी नाटक करण्याचें मनावर घेतलें नव्हतें तें या मंडळीनें घेतल्यामुळे त्यांची त्यावेळी फारच प्रशंसा झाली. या मंडळीसंबंधानें 'केसरी' पत्राने तारीख १७।२।८५ च्या अंकांत पुढील उद्गार काढले आहेत:- " पूर्वी नाटके करणे हा हलक्या लोकांचा धंदा समजत असत. पुढे डेक्कन कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत नाटके करण्याचा प्रघात पाडून या करमणुकीस संमाननीयत्व आणले. पण या मंडळीस पुण्याच्या लोकांपुढे मराठी नाटकाचा प्रयोग करून दाखविण्याची छाती अद्यापि झाली नाहीं; तथापि, जी गोष्ट डेक्कन कॉलेजाच्या धीट विद्यार्थ्यांच्या हातून होईना ती करून दाखविण्याचे श्रेय राजाराम कॉलेजाच्या विद्यार्थ्यांनी संपादिले. ” या कॉलेजचे माजी प्रिन्सिपाल मि० कंडी हे मोठे हौसी असून आपली शाळा, आपले विद्यार्थी, आपला शिक्षक- वर्ग यांचा त्यांना मोठा अभिमान असे; व नाट्यकला ही एक उत्तम कला असून तींत आपल्या विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवावें असें त्यांना वाटत असे. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्र भाषेत चांगली चांगली नाटके निर्माण व्हावी अशी त्यांची फार इच्छा होती. ही इच्छा त्यांचे ठायीं उत्पन्न करण्यास त्या कॉलेजांतील प्रोफेसर- मंडळीच पुष्कळ अंशी कारणीभूत झाली व त्यांच्या इच्छेस पुढे चांगले यशही आले. असो; ही मंडळी
पान:मराठी रंगभुमी.djvu/68
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५२
मराठी रंगभूमि.