रा. बळवंतराव जोग, गणपतराव जोशी व गोविंदराव सुपेकर यांच्यासारखे इसम अनुक्रमें त्राटिका, प्रतापराव व पिल्या यांचीं कामें करणारे असल्यामुळे प्रयोगास सुरवात झाल्यापासून तो संपेपर्यंत सारखा हशा पिकत असे. प्रथमतः त्राटिका रंगभूमीवर आली ह्मणजे तिनें पिंजारलेल्या केंसांचा कसा तरी बुचडा बांधलेला पाहून, हातांत लाटणें घेऊन वडिलधा-या माणसांच्या आंगावर तिचें खिसकावणें ऐकून, व बहिणीचीं रागारागानें गालगुचीं घेतलेलीं पाहून प्रेक्षकांत टाळी न देणारा इसम कचितच भेटेल. तसेंच प्रतापरावाचा लझाच्या वेळचा सतरा ठिगळे लावलेला पोषाख, मामाबरोबर त्याचें रोखठोकीचें भाषण, पिल्यावरील करडा अंमल, त्राटिकेनें ऊन्ह ह्यटलें कीं आपण सावली ह्मणावयाचें हा त्याचा बहाणा, व शेवटीं युक्तीप्रयुक्तीनें त्राटिकेची आनंदी बनून त्या नवराबायकाचें आनंदानें चालललें भाषण ऐकून ज्याची चित्तवृत्ती आनंदी होत नाहीं असा प्रेक्षकांत एकही इसम निघणार नाहीं. पिल्याच्या विनोदानें आणि थट्टेनें तर लहान मुलापासून ह्याता-यापर्यंत सर्वांचीं पोटें दुखून येत. या कामास विशेष बहार चढण्यास रा. सुपेकर यांचा चेहरा व आवाज पुष्कळ अंशीं कारणीभूत होता. चाकराच्या कामास हा चेहरा व आवाज इतका कांहीं ठीक होता कीं, असें उदाहरण आजपर्यत झालेल्या नाटककंपनीत कश्चितच दृष्टीस पडेल. यांच्या आवा-
पान:मराठी रंगभुमी.djvu/75
हे पान प्रमाणित केलेले आहे.
५९
भाग १ ला.