उद्गार आपल्या एका स्नेह्याजवळ काढतांना आमी ऐकलें आहे. हॅम्लेट नाटकांत पोलोनियसचे काम शास्त्रीबुवा करीत असत व ते चांगले होत असे. अलीकडे पूर्वीची कांहीं पात्रे निघून जाऊन त्यांचे जागी नवीं पात्रं आल्यामुळे ह्मणा, किंवा पहिल्या पहिल्याने या मंडळीस जितकी हुरूप होती तितकी आतां राहिली नसल्यामुळे ह्मणा अथवा दुसऱ्या काही कारणांमुळे म्हणा, पूर्वी यांच्या नाटकांस जितका रंग चढत असे तितका आतां चढत नाही, हे जुन्या प्रेक्षकांच्या नजरेस आल्यावांचून राहणार नाही. तथापि, एवढी गोष्ट खरी आहे की,आजमितीला बुकिश नाटके करणारी हीच एक चांगली कंपनी असन तिच्या जोडीची दुसरी नाही. या मंडळीने 'झोंपी गेलेला जागा झाला' हा फार्स चांगल्या रीतीने बसविला होता. हा फार्स अरेबियन नाइट्समधील — Sleeper awakened ' या गोष्टीवर रचलेला असून त्यांत रा. बळवंतराव हे दासीचें काम करीत असत, व शास्त्रीबुवा हे बनविलेल्या राजाचें करीत असत. ही दोन्ही कामें प्रेक्षणीय होत असत. खरे राजे रा. सुपेकर हे होत असत; पण मागें सांगितल्याप्रमाणे त्यांचा आवाज व चेहरा राजाच्या कामास योग्य नसल्यामुळे तें काम नीट वठत नसे. या फार्सीत बीभत्सपणा कांहीं नसून हास्य व विनोद भरलेला आहे. अलीकडे हा फार्स ही मंडळी करीत असल्याचे आढळून येत नाही.
पान:मराठी रंगभुमी.djvu/78
हे पान प्रमाणित केलेले आहे.
६२
मराठी रंगभूमि.