पान:मराठी रंगभुमी.djvu/92

हे पान प्रमाणित केलेले आहे.
७६
मराठी रंगभूमि.


नाहींत हा नाटकवाल्यांचा जसा दोष आहे तसाच ग्रंथकर्त्यांचाही आहे. पण हें विषयांतर होत असल्यामुळे त्याची विशेष चर्चा येथें करण्याचें कारण नाहीं. सांगावयाचें म्हणून एवढेच कीं, नारायणराव पेशव्यांचा वध किंवा झांशीच्या राणीचें बंड या स्वदेशाच्या इतिहासांतील महत्वाच्या गोष्टी असून व आजपर्यंत त्या मराठी रंगभूमीवर अनेक वेळीं आल्या असून त्यांत नाटकवाले किंवा ग्रंथकार यांनीं सुधारणा करण्याची खटपट मुळींच केली नाहीं.
  'दामाजीपंताचें चरित्र ' हेंही एक ऐतिहासिक नाटकांपैकींच एक नाटक आहे. या नाटकाचा प्रयोग जुन्या नाटकमंडळ्या करीत असून त्यांतल्या त्यांत साठे, उंब्रजकर या नाटकमंडळींचा हा प्रयोग प्रेक्षणीय होत असे. पौराणिक नाटकें करणान्या कंपन्या बंद झाल्यापासून अलीकडे हा प्रयोगही बंद झाला आहे. ईश्वरनिधनें आपल्यावर आलेलें संकट दूर करून मुसलमान बादशहासही प्रत्यक्ष देवदर्शन करविलें अशा प्रकारचें दामाजीपंताचें चरित्र भक्तिरसानें ओतप्रोत भरलें असल्यामुळे पौराणिक नाटकें करणा-या कंपन्यांनीं तें करण्याचें मनावर घेतलें असावें, व त्यांची सर्व नजर भक्तिरसाकडेच असल्यामुळे ऐतिहासिक दृष्ट्या त्याचा विचार न कारतां साधारणपणें पौराणिक नाटकाच्या धर्तीवरच त्यांनीं तें नेलें. दामाजीपंताचें चरित्र हें मुसल-