धर्म चांगला, आपण सर्वस्वी त्यांचे अनुकरण केले पाहिजे
ह्मणणारे उतावळे सुधारक; तसेंच सुधारणा हळूहळू
सगळ्या राष्ट्राला अपाय न होईल अशा रीतीने कराव्या,
अनुकरण योग्य तें करावें, जुनें सगळे कांहीं वाईट नाहीं
असें ह्मणणारे रीऑक्शनिस्ट्स; बूट स्टाकिंग, हाफजाकिटें,
झगे घालणान्या व नवन्याला कस्पटाप्रमाणे समजून स्वैर
वर्तन करणा-या सुशिक्षित स्त्रिया; स्त्रियांचे हायस्कूल,
बंडगार्डन, आर्यमहिला हॉटेल, प्रार्थनासमाज, ब्रह्मसमाज, इ. निरनिराळ्या स्थलांची व पात्रांची योजना
नाटककाने केली आहे. पुण्यासारख्या ठिकाणी
नाटकांत वर्णन केल्याप्रमाणे गोष्टी प्रत्यक्ष घडू लागल्यामुळे दहा बारा वर्षांपूर्वी या नाटकास तेथें एक प्रकारचे
विशेष स्थानिक महात्म्य प्राप्त झाले होते; व 'परांजपे
कंपनी'ने या नाटकाचे प्रयोग जेव्हां तेथील रंगभूमीवर
सुरू केले तेव्हां तर फारच चळवळ उडून सुशिक्षित व
अशिक्षित अशा दोन्ही लोकांच्या झुडीच्या झुंडी तो
खेळ पहावयास जात. या नाटकांत परशरामपंत हाणून
में एक सुधारलेल्या दारू पिणाऱ्या पदवीधर वकिलाचें
पात्र घातले आहे, त्याची भूमिका या कंपनीत रा.
प्रधान या नांवाचे इसम करीत असत; व प्रत्येक प्रवेशांत
दारू ह्मणून हे रंगभूमीवर पाण्याच्या इतक्या काही
बाटल्या पीत असत की, ते पाहून प्रेक्षक मोठे थक्क होत
असत. रा. प्रधान यांनी रंगभूमीवर हव्या तितक्या
पान:मराठी रंगभुमी.djvu/98
हे पान प्रमाणित केलेले आहे.
८२
मराठी रंगभूमि.