पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/10

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी




प्रस्तावना


 गेल्या काही वर्षांत विद्यार्थ्यांच्या आणि इतर लोकांच्याही संबंधात शुद्धलेखन हा एक चिंतेचा विषय झाला आहे. व्हस्व, दीर्घ, अनुस्वार, विरामचिह्न, जोडाक्षरे अशा सर्वच प्रकारांमध्ये अनेक प्रकारच्या चुका आढळून येतात. संस्कृत भाषेचे अज्ञान आणि गेल्या काही वर्षात झालेली शुद्धलेखनाची उपेक्षा यामुळे अशी परिस्थिती उत्पन्न झालेली दिसते. मध्यंतरी शुद्धलेखनाच्या नियमांमध्ये काही बदल झाले. त्याचीही अनेकांना माहिती दिसत नाही.
 या पार्श्वभूमीवर डॉ. भा. व्यं. गिरिधारी यांनी लिहिलेली शुद्धलेखनासंबंधीची ही छोटेखानी पुस्तिका आणि त्याला जोडलेले अन्य लेखन संदर्भातील मार्गदर्शन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. शुद्धलेखनासंबंधी विस्तृत विवेचन करावे, अशी या लेखनामागे अपेक्षा नाही. नित्याच्या व्यवहारात लेखन करीत असताना योग्य प्रकारचे मार्गदर्शन करावे हा या प्रयत्नामागचा हेतू दिसतो. त्यामुळे विशेष विस्तार न करता अगदी मोजक्या पण वेचकशब्दात त्यांनी सूचना दिल्या आहेत. कोणत्या प्रकारच्या चुका वारंवार होतात, हे लक्षात घेऊन त्यानुसार मार्गदर्शन केले आहे. डॉ. गिरिधारी मराठीचे प्राध्यापक असल्यामुळे आणि विद्यार्थ्यांचे लेखन त्यांच्या नजरेतून जात असल्यामुळे नेमके काय आणि कसे सांगावे याची योग्य कल्पना त्यांना आहे. मराठी उपसर्ग विचार, वाक्य विचार काही नित्योपयोगी अशा प्रति शब्दांच्या याद्याही त्यांनी पुरवल्या आहेत. महत्त्वपूर्ण लेखांची पुस्तीही त्याला जोडली आहे. त्यामुळे आकाराने लहान असले तरी सर्वांगपरिपूर्ण असे स्वरूप या पुस्तकाला आले आहे. या विषयाचा अधिक अभ्यास करू इच्छिणाऱ्यांसाठी त्यांनी काही पुस्तकांची नावेही सूचवली आहेत.

 डॉ. भास्कर गिरिधारी यांचा हा प्रयत्न कौतुकास्पदच म्हणायला हवा. त्यासाठी त्यांनी

०७...