पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/13

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी




लेखनातील उणिवा धकवायला वाव उरत नाही. मात्र त्यासाठी या पुस्तकातील शुद्धलेखनाचे विवेचन आणि विश्लेषण समजावून घेणे अगत्याचे आहे.
 शुद्धलेखन हा व्याकरणाचाच एक भाग असल्यामुळे व्याकरणातील नियमांना अनुसरून केलेले लेखन म्हणजेच शुद्ध लेखन होय. लिहितांना होत असणाऱ्या प्रमादांची जाणीवही पुष्कळदा आपल्याला नसते. अनेकदा, नकळत, अनावधानाने वसवयीने आपणचुकीचेच शब्द लिहीत असतो.
 उदा. 'जेंव्हा', 'तेंव्हा' वर आपण अनुस्वार देतो. कादंबरीशब्द लिहितांना अनुस्वाराची जागा चुकते, हे मुद्दाम जरी घडत नसले तरी शेवटी त्या शुद्धलेखनाच्यादृष्टीने चुका होतात हे लक्षात घेऊन त्याची शुद्ध रूपे जाणून घेतली पाहिजे.









१०...