पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/14

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





शुद्धलेखन म्हणजे काय?


 'मराठी भाषेने देवनागरी लिपीचा स्वीकार केला आहे. देवनागरीमध्ये मराठी शब्द किती प्रमाणात उच्चाराशी प्रमाणिक राहतात याचा विचार म्हणजे मराठीच्या शुध्दलेखनाचा विचार होय' असे डॉ. लीला गोविलकर यांनी मराठीचे व्याकरण' या ग्रंथात प्रतिपादन केले आहे (पृ. २२३). शुद्धलेखन हे प्रामुख्याने वर्ण व वर्णमाला यांच्याशी निगडित असते. भाषेतील निधी म्हणजे शब्दांचा कोश व विधी म्हणजे भाषेतील व्यवहार, व्यवस्था कालांतराने सतत बदलत राहते. भाषाशास्त्रीय दृष्टीने तर हे होणे अपरिहार्य व बरोबरच आहे; पण भाषेबरोबरच भाषेचे शुद्धलेखनही सतत बदलत जाते. व्याकरणाने भाषेच्या, शब्दांच्या ज्या रूपाला मान्यता दिली व जी रूपे भाषिक व्यवहारात रुढ आहेत, तीच रुपे, त्यांचेच लेखन आपणशुद्ध मानतो, उदा. 'म्या' 'त्वा' ही एकेकाळची शिष्टसंमत रुपे आज प्रचारात नाहीत. भाषेतील उच्चारणांशी शुद्धलेखन संबद्ध असल्याने कालपरत्वे उच्चारानुसार शुद्धलेखनही बदलतांना दिसते. व्याकरणातीलशुद्धाशुद्धीचाही शुद्धलेखनाशी जसा संबंध असतो, तसाच भाषा शुद्धीचाही शुद्धलेखनाशी संबंध असतो. भाषाशुद्धीकरणाची मोहीम हाती घेतलेल्यांना परभाषेतील शब्द टाळावेत असे वाटेल, पण शुद्धलेखनाचा या गोष्टींशी फारसा संबंधच येणार नाही. फार तर अशा शब्दातील हस्व-दीर्घ काटेकोर नियमांमध्ये बसविता येत नाहीत या गोष्टीपुरताच येईल. उदा. कुडता' हा शब्द वापरावा की विदेशी म्हणून टाळावा हा विवेक भाषाशुद्धी प्रकरणात येईल. लेखनातील शुद्धलेखनाचा संबंध एवढाच की कुमार शब्दातील 'क' चा उकार कोणता असावा. तेव्हा शुद्धलेखन हे प्रामुख्याने लेखनातील शुद्धता दाखविण्यासाठी असते. म्हणूनच व्याकरणकार मोने यांनी शुद्धलेखन' या ऐवजी 'लेखन-शुद्धी' प्रकरण लिहिले आहे. उच्चारणांशी लेखनशुद्धीचा संबंध त्यांनी मानला आहे.
 मो. के. दामले या व्याकरणकारांच्या दृष्टीने बोलणेच लेखनानुसारी असावे, कारण





११...