पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/17

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





अनुस्वार देण्याची गरज नाही.

ख) -हस्वदीर्घ

नियम ५) तत्सम (व्हस्व) इकारान्त आणि उकारान्त शब्द दीर्घान्त लिहावेत. उदा. कवी, मती, गती, गुरू. इतर शब्दांच्या अंती येणारा इकार व उकार दीर्घ लिहावा. उदा. पाटी, जादू, पैलू, विनंती, ही (शब्दयोगी अव्यय)
अपवाद : आणि, नि.
स्पष्टीकरण :- परंतु, यथामति, तथापि, अद्यापि, प्रभृति, तत्रापि वगैरे तत्सम अव्यये -हस्वान्तच लिहावीत. तसेच सामासिक शब्दांतही तत्सम (हस्व) इकारान्त व उकारान्त शब्द पूर्वपद असताना हस्वान्तच लिहावेत. उदा. बुद्धिवैभव, कविराज, गतिमान, गुरुवर्य.
मी, तू, जी, पी, धू, तू, अशा त-हेचे एकाक्षरी शब्द दीर्घ लिहावेत. तू, ही, जी, ती, या सर्वनामांच्या सामान्यरुपांत अन्त्य स्वर हस्व उच्चारला जातो, म्हणून तो हस्वच लिहावा. उदा. तुला, हिचा, जिला, तिचा. मात्र 'स', 'ते', व 'त' प्रत्यय लावतांना वरील शब्दांतील अन्त्य स्वर दीर्घच राहतो. उदा. तूस, हीस, तीते, जीत.
नियम ६) (दीर्घ) ईकारन्त व ऊकारान्त शब्दांतील अन्त्य इकार व उकार हस्व लिहावेत. उदा. माहिती, हुतुतू, सुरू.
अपवाद - नीति, भीति, रीति, कीर्ति इत्यादी तत्सम शब्द. (मात्र या शब्दांचा अन्त्य इकार आता दीर्घ (ई) होईल). उदा. : नीती, किर्ती इ.
नियम ७) अकारान्त शब्दांचे उपान्त्य इकार, उकार दीर्घ लिहावेत. उदा. गरीब, वकील, वीट, सून, वसूल.

अपवाद - -हस्वोपान्त्य अकारान्त तत्सम शब्द.



१४...