पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/18

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी




उदा. गुण, विष, मधुर, प्रचुर, मंदिर, अद्भुत, अंकुश, शिबिर इ.
नियम ८) उपान्त्य दीर्घ ई-ऊ असलेल्या शब्दांचा उपान्त्य इकार-उकार उभयवचनी सामान्यरूपाच्या वेळी हस्व लिहावा. उदा. गरिबास, वकिलांना, सुनेला, वसुलाची, नागपुरास, जिवाला. अपवाद - दीर्घोपान्त्य तत्सम शब्द : उदा. शरीरास, गीतेत, सूत्रात, जीवास (प्राणी या अर्थी). सामान्यतः तत्सम शब्दाच्या मूळ रूपात बदल करू नये.

ग) किरकोळ


नियम ९) 'पूर' हा ग्रामवाचक शब्द कोणत्याही ग्रामनामास लावताना दीर्घोपान्त्य लिहावा. उदा. नागपूर, संबळपूर, तारापूर, वैजापूर, सोलापूर इत्यादी.'पू' हे अक्षर दीर्घ लिहावे.
नियम १०) कोणता, एखादा ही रूपे लिहावीत, कोणचा, एकादा ही रूपे लिहू नयेत.
नियम ११) हळूहळू, मुळूमुळू, खुटूखुटूयाशब्दांतील दुसरा व चौथास्वर दीर्घ लिहावा.
नियम १२) एकारान्त नामाचे सामान्यरूप या कारान्त करावे. उदा. करण्यासाठी,फडक्यांना, पाहण्याला इत्यादी. एकारान्त सामान्यरुपे करू नयेत. पूर्वी एकारान्त शब्दप्रयोग करण्याच्या प्रघातानुसार ‘आमचे घरी आपले मुलाबाळांसह अगत्य येणेच करावे' असे लिहीत, पण आता याकारान्त रुपे वापरुन आमच्या घरी आपल्या मुलाबाळांसह अगत्य येण्याचे करावे (किंवा यावे)' असे लिहावे लागेल.
नियम १३) लेखनात पात्राच्या किंवा वक्त्याच्या तोंडी बोलण्याची भाषा घालावी

लागते. त्यावेळी तिचे स्वरूप बोलण्यातील उच्चाराप्रमाणे असावे. एकारान्त नपुसकलिंगीशब्दाचे अकारान्त रूप योजावयाचे झाल्यास अशा अकारान्त रूपाच्या अन्ती अनुस्वार दिलाच पाहिजे. उदा. 'त्याचे



१५...