पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/2

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लेखकाविषयी थोडेसे :
 डॉ. भास्कर व्यंकटराव गिरिधारी हे नाशिकच्या एच.पी.टी. महाविद्यालाचे माजी प्राचार्य व मराठी विभाग प्रमुख आहेत. त्यांनी प्रदीर्घकाळ मराठीचे अध्ययन व अध्यापन केलेले आहे. मराठी भाषा तज्ज्ञ, संशोधक आणि समीक्षक म्हणून त्यांचा लौकिक आहे. त्यांच्या मार्गदर्शनाने आतापर्यंत १६ विद्यार्थ्यांनी पीएच.डी. आणि १४ विद्यार्थ्यांनी एम.फील. पदवी संपादन केली आहे.सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात ते सतत कार्यरत असतात. त्यांचे १२ ग्रंथ प्रसिद्ध झाले असून सुमारे २५ पुस्तकांना त्यांच्या प्रस्तावना आहेत. आजवर त्यांना व त्यांच्या ग्रंथांना विविध पुरस्कार मिळाले आहेत.
 विशेष म्हणजे मुंबई विद्यापीठ मराठी अभ्यासमंडळाचे ते माजी अध्यक्ष होते आणि आता मुंबई विद्यापीठाच्या मराठी संशोधन आणि मान्यता समितीचे विषय तज्ज्ञ आहेत. महाराष्ट्र शासनाचे अधिकृत मान्यताप्राप्त भाषांतरकार आहेत. त्याचप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राला एक अभ्यासू वक्ते म्हणून त्यांची ओळख आहे.