पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/20

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी




४) नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरुपांवर व आदरार्थी हेतूने अनुस्वार द्यावेत. उदा. चांगल्यांची ..
५) शक्यतो मूळ शब्दांतील अक्षरे यथोच्चार -हस्व किंवा दीर्घ लिहावीत. मंदिर,शिबिर, गीता, कीर्ती.
६) हस्व 'इ' कारान्त हस्व 'उ' कारान्त तत्सम शब्द वाक्यात दीर्घान्त लिहावीत.कवी, गुरू, प्रीती.
७) विभक्तिप्रत्यय जोडतांना अन्त्य हस्व स्वर दीर्घ होतो. भाविकांना, रीतीने, कृतीतून.
८) तत्सम -हस्व इकारान्त व उकारान्त शब्दसमासात पूर्वपदी -हस्वातन्तच लिहावेत.कविराज, गुरुदेव, भूमिपूजन.
९) अकारान्त तत्सम शब्दांतील उपान्त स्वर व्हस्व 'इ' किंवा-हस्व 'उ' असल्यास तो हस्वच लिहावा. मंदिर, शिबिर, मारुत.
१०) दीर्घोपान्त्य तत्सम शब्द दीर्घच लिहावेत. गीतांजली, आशीर्वाद, परशुराम.
११) व्यंजनान्त तत्सम शब्द अकारान्त लिहावेत. परिषद, अकस्मात,.
आपण लिहीत असतांना शब्दांच्या लेखनात अशुद्धता बरीच आढळते. याला कारण शुद्धलेखनाच्या अधिकृत (उपरोक्त) नियमांविषयीचे अज्ञान हे असले तरी इतरही अनेक कारणे सांगता येतील. त्यांचे सोदाहरण विवेचन पुढे दिले आहे.
१) वर्णाचा क्रम बदलल्यामुळे होणाऱ्या चुका (शुद्ध रूपे कंसात दिली आहेत).समात्प (समाप्त), शब्द (शद्व), चमत्तकार (चमत्कार)
२ )संस्कृत भाषेच्या अज्ञानामुळे होणाऱ्या चुका.
अभिष्ट (अभीष्ट), अनावृत्त (अनावृत), आशिर्वाद (आशीर्वाद)
३) अयोग्य उच्चारामुळे होणाऱ्या चुका.

कल्यान (कल्याण), द्रुष्ट (दुष्ट), मानूस (माणूस)



१७...