पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/23

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी




उदा. धार्मिक, शैक्षणिक, भौगोलिक, आर्थिक, ऐतिहासिक, औद्योगिक, सामाजिक, वैचारिक, त्रैमासिक, बौद्धिक, पारंपारिक, मौखिक, वैदिक, धनिक, पडिक, रसिक, पथिक, वैमानिक, नागरिक, साहजिक इत्यादी.
५) ईय व वेगळे ईन प्रत्यययुक्त शब्द दीर्घ ईकारयुक्त लिहावेत.
उदा. शास्त्रीय, भारतीय, राष्ट्रीय, एतद्देशीय, परकीय, स्वकीय, प्रेक्षणीय इ.
कालीन, ग्रामीण, विद्यालयीन, कार्यालयीन इ.
६ )संस्कृत मधून आलेले दीर्घ ईकारान्त व ऊकारान्त शब्द दीर्घच लिहावेत. त्यांचे दीर्घत्व कायम राहते.
उदा. नदी, देवी, जननी, पत्नी, श्री, पृथ्वी, अग्रणी, इ.
वधू, चमू, भू, चंपू इ.
७ )रफारापूर्वीचा ईकार व ऊकार सामान्यत: दीर्घच लिहावा. उदा. दीर्घ, उत्तीर्ण, जीर्ण, संकीर्ण, वीर्य, मार्गशीर्ष, सूर्य, पूर्व, संपूर्ण, चूर्ण, धूर्त, मूर्ख, विस्तीर्ण,कीर्ती,
अपवाद- दुर्ग, खुर्ची, तुर्क, निर्भय, खुर्द, खुर्दा इत्यादी.
८ ) साधित शब्दांतील उकार व इकार मुळातील प्रत्ययानुसार लिहावेत. उदा. लाजाळू, झोपाळू, पोटभरू, झाडू, लढाऊ, विकाऊ, जळाऊ, सोशीक, खर्चीक, लवचीक, जाणीव, उणीव, नेणीव, चकचकीत, घडीव, पाळीव, फुटीर, फुगीर, चढाई, लढाई, लेखणी, वर्तणूक, भरती इ.
९ ) संस्कृतमधील इन्नन्त शब्द दीर्घ ईकारान्त लिहावेत. उदा. धनी, पक्षी, विद्यार्थी, प्राणी, दंडी, प्रभावी, तेजस्वी, ब्रह्मचारी, ग्रामवासी, वनवासी, भाग्यशाली, मध्यवर्ती, महत्त्वाकांक्षी, ध्येयवादी. जीवनदायी, अनुयायी. उपरोक्त शब्दांची स्त्रीलींगी रूपे -

पक्षिणी, विद्यार्थिनी, तेजस्विनी, ब्रह्मचारिणी, सुवासिनी, ज्ञानवर्धिनी, मर्दिनी.



२०...