पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/25

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





१९) दोन अक्षरी शब्द : अन्त्य स्वर दीर्घ, अशा वेळी उपान्त्य इकार व उकार सामान्यतः हस्व लिहावेत. उदा. विडा, फिका, सुरां, दुवा, दिवा, तुरा इ.
- हाच नियम विशेषनामांनाही लागू आहे.
उदा. जिवा, शिवा, भिवा, इ.
- मात्र संस्कृतमधून आलेले तत्सम शब्द मुळाप्रमाणे लिहावेत. उदा. वीणा, क्रीडा, सीमा, सीता, भीमा इ.
२०)दोन अक्षरी शब्द : अन्त्य व उपान्त्य इकार व उकार उपान्त्य हस्व व अन्त्य दीर्घ लिहावेत.
उदा. किती, पिसू, फुली, भुई, कुंकू, गुढी, चिकी, विंचू, मुंगी, कुडी, पिढी, कुणी इत्यादी.
काही विशेषनामे -
उदा. भिकू, विसू, विजू, विनू, दिनू, इत्यादी.
२१) तीन अक्षरी शब्द : अन्त्य इकार व उकार सामान्यत: दीर्घ लिहावेत.
उदा. पडवी, राहुटी, पणती, सुकाणू, पाखरू, इत्यादी.
२२) अनुस्वारयुक्त इकार व उकार सामान्यत: हस्व लिहावेत. उदा. चिंच, नारिंग,कुंचा, गुंड, सुरुंग, सुंठ, उंट, तुरुंग, कुंड, गुंग, बाशिंग.
२३) काही अनेकाक्षरी शब्दांतील 'इ' कार 'उ' कार : उदा. शिकेकाई, दालचिनी,पुष्करिणी, कोशिंबीर, इंद्रायणी, राजधानी, सरोजिनी, सौदामिनी, भद्रकाली,कवयित्री.
२४) नामसाधित (तद्धित) अल्पत्वदर्शक शब्दांचे लेखन: उदा. डोंगरी, विळी, वाडी,वाटी, टोपली, तबकडी, चांदुकली, धनुकली, पाखरू, शिंगरू, मेंढरू, वासरू.

२५) अन्य भाषेतील शब्द त्या लकबीनुसार व्हस्व - दीर्घ लिहावेत उदा. फकिरी, गाफिल, हकीम, दिक्कत इत्यादी.



२२...