पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/26

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





२६) पुरुष वाचक सर्वनामे- सर्व दीर्घच लिहावेत. मी, ती, ही, जी आम्ही, तुम्ही इ.त्यांना विभक्ती प्रत्यय लावतांना हस्व होतात. उदा, तुला, तिने.
२७) कालदर्शक रूपातील इकार १) वर्तमाकाळ : लिहितो, करितो, देववितो, दाखवितो इ. २) भूतकाळ : लिहिले, देवविले, दाखविले ३) भविष्यकाळ : देईन, करीन, लिहीन, देशील, लिहिशील, लिहू. ४) अपूर्णकाळ : ईत = लिहीत, करीत, दाखवीत, इत्यादी.

शब्दसिद्धी प्रकरण

  संस्कृतमधून जसेच्या तसे, अविकृत, कोणताही बदल न होता आलेल्या शब्दांना 'तत्सम शब्द' म्हणतात. उदा. हस्ती, संस्कार, मंत्र, सत्य, बंधू, माता, पिता, पुण्य, स्वर्ग, पवित्र, श्रोता, पूजा, कन्या, संकल्प, इत्यादी शब्द तत्सम आहेत.
 संस्कृत भाषेमधून बदल होऊन आलेल्या शब्दांना ‘तद्भव' शब्द म्हणतात. उदा. भाऊ, घर, पंख, चाक, दूध, कान, पान, ओठ, आग, चोच, हे शब्द अनुक्रमे भ्रातृ, गृह, पक्ष, चक्र, दुग्ध, कर्ण, पर्ण, चक्र, ओष्ठ, अग्नि, चंचू, पंच या संस्कृत शब्दापासून उद्भवलेले आहेत. जे शब्द इतर भाषेतून आलेले असतात त्यांना विदेशीशब्द' म्हणतात. उदा. छावणी, बटाटा, टेबल, टेप, रेडिओ, कुमक, करामत, माहिती, इ.
 जे शब्द अन्य कोणत्याही भाषेतून आलेले आहेत असे व्युत्पत्तीवरून म्हणता येणार नाही व खास मराठीतच ते तयार झालेले आहेत, अशा शब्दांना 'देशी शब्द' म्हणतात. उदा. आकाश, निवारा इ. मूळ शब्दांच्या किंवा धातूंच्या मागे एक वा आधिक अक्षरे लावून जे शब्द बनतात त्यांना उपसर्गघटित शब्द' म्हणतात. उदा. अ, व, आ, उ, त्, अधि, दूर, प्र, प्रति, उप, नि, भर, ना, बिन, बे, हे, उपसर्ग आहेत व यावरून अनेक शब्द बनतात. उदा. : उत्कर्ष, नापसंत, अनोळखी, दुर्जन, अवलक्षण.

 काही शब्दांच्या किंवा धातूंच्या पुढे एक वा अधिक अक्षरे लागून जे शब्द तयार



२३...