पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/28

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी




 भाषा व्यवहाराला लेखन पूरक आहे, तरी लेखन शुद्धी कटाक्षाने पाळणे गरजेचे आहे. ध्वनिरूप भाषेला आपण दृश्यरूपात लेखनविष्ट केलेले असते.

 प्रत्येक लिपीत काहीना काही उणिवा असतातच इंग्रजीत स्पेलींग वेगवेगळ्या प्रकारे होते. काही अक्षरांचे उच्चारण होत नाही किंवा त्याच त्या अक्षराचे उच्चार होतात. उदा. पुट (Put) कट (Cut); केमिस्ट्री Chemestry, सायकॉलॉजी Pyschology तसे मराठीतही लेखन आणि उच्चारण यात फरक आढळतात. उदा. चमचा-चलाख, झरा-झकास, सिंह, मौंस, असे उच्चार करीत असूनही लिहितांना सिंह, मांस, असेच लिहितो. या कोणत्याही लिपीतील त्रुटी आपण समजून घेणे भाषा शिकताना आवश्यक आहे. महत्त्वाचे म्हणजे 'बोलणे' हवेत विरते, लेखन मात्र भविष्यकाळातही दीर्घ काळ टिकून राहते. यासाठी लेखन शुद्धी राखणे अत्यावश्यक आहे. नियमित, नि:संदिग्ध आणि सुव्यवस्थित लेखन केल्यास तो दूरदृष्टीने भाषाभिवृद्धीसाठी हिताचे ठरणार आहे. गुणदोषांसह सर्वसामान्य व रुढ नियम पाळूनच लेखन-शुद्धी जपता येईल.



२५...