पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/29

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





शास्त्रात रुढी : बलीयसी!

काही वेळा प्रथा आणि रुढी यांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. याची उदाहरणे पाहता येतील.
- ह चा उच्चार आधी होत असल्याने चिह्न, प्रह्लाद हे शब्द असे लिहावेत.
- क + र हे वर्ण म्हणून = क्र, तर क + रु = कृ म्हणून उच्चार समान वाटले तरी लेखन भिन्न होते.
- 'श' आता असा रेषेखाली लिहिला तर चालत नाही. पूर्वी रेषेखाली छोटी उभी रेषा देत असत. आता त्यालाही मान्यता आहे. (श)
'सृजन' हे लेखन रूप अयोग्य, कारण येथे ऋचा अर् होतो. म्हणून 'सर्जन' असेच लिहावे.
- रु असा हस्व असतो, उदा:- ‘रुपये'. तर 'रू'असा दीर्घ असतो उदा:- 'रूप'.
- पहा, रहा, हे बरोबर आहे, पण पाहा, राहा हे जास्त बरोबर आहे.
- वेदात श्र असा काढीत, म्हणून श ऐवजी श्र रुढ झाला म्हणून श्री' लिहावा.
ख असा लिहावा कारण र, व मधील फरक जाणवतो. तसेच ल, ऋचे नवीन लेखन होते.

न आणि ण कोठे वापरावा याचा विचार :

 ट, ठ, ड, ढ, ण म्हणतांना वरच्या टाळूला जीभ लागते. ते मूर्धन्य स्थान तेव्हा बाणाचा ‘ण' योजावा. (उदा. : टणक) जेव्हा दंत स्थानापासून उच्चार होतो तेव्हा 'न' लिहावा. (उदा. : तनय) मराठी शब्दात ण (क्रियापदात) येतो. पळणे, खाणे, पिणे, कळणे.

 ऋ, र, ष या वर्णामुळे न चा ण होतो. ऋ, ष, र आणि ण यांच्यामध्ये स, श, ल, व आणि च, त, ट वर्ग येऊ नये. उदा:- दर्पण, कृपण, अर्चना, भोजन, समाधान इत्यादी.



२६...