पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/30

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





न् चा ण् होण्यासंबंधी नियम

१) एकाच पदांच्या रूपांमध्ये ऋ, र, ष यांच्यापुढे न् हे व्यंजन आल्यास न् चा ण् होतो.
२) ऋ, र, ण् व न् यांच्यामध्ये स्वर ल् शिवाय अर्धस्वर ट, क वर्ग व प वर्गातील व्यंजने यांच्यापैकी कोणताही वर्ण आला तरी न् चा ण् होतो. उदा. रामेण्, हरीणा
३) वर उल्लेख केलेल्या वर्गांशिवाय इतर वर्ण आल्यास न् चा ण् होत नाही. उदा.फलेन्, देवेन् मात्र न् रूपाच्या शेवटी असू नये. उदा. रामेण् - न् + अ आल्यामुळे ण झाला.
रामान् - न् रूपाच्या शेवटी आल्यामुळे ण् झाला नाही.
साधारणपणे आधी ज्या वर्णाचा उच्चार होतो तो अपूर्ण असतो. जसे माध्याह्न, (मध्यान्ह नको). बद्ध, ब्रह्म, चिह्न.
षट्यब्दी = षष्टी = ६० + अब्द = वर्ष, येथे मूळ रुपात ट आहे. समाहारात ई होतो (उदा. /षप्ट अद्वानाम समाहारः ।: पंचवटी ) म्हणून षट्यब्दी.

लक्षात ठेवण्या जोगे थोडेसे

 तितिक्षा येथे तिक्ष चे अभ्यासाने द्वित्त होते (अर्थ = सहनशक्ती)
'प्रार्थनीय' शब्द वापरू नये. त्यात प्रार्थना करण्याजोगी आहे एवढाच अर्थ होतो. 'अगत्याने यावे' असा अर्थ होत नाही. 'प्रार्थना करतो' असे शब्द योजावे.
क्षमस्व - तू मला क्षमा कर. असा अर्थ आहे म्हणून मोठ्या माणसांसाठी तो शब्द वापरू नये.

धन्यवाद = चांगल्या कामाबद्दलची स्तुती, म्हणून मोठ्यांनी लहानांना धन्यवाद द्यावेत. लहानांनी मोठ्यांना ‘धन्यवाद' म्हणू नये.



२७...