पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/31

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





 नेहमी लिहतांना अनवधानाने चुका होणारे काही निवडक शब्द

शुद्ध शब्द लेखन स्वाध्याय :-(२५ शब्द २५ गुण धरावेत)
(चाचणी परीक्षा घेतांना अचूक शद्वाला ०१ गुण द्यावा.)
पुढील शब्द लिहा :(खाली दिल्याप्रमाणेच त्याचे लेखन असायला पाहिजे.)

 अद्ययावत,ऊहापोह,ज्येष्ठ,तज्ज्ञ,देदीप्यमान,व्यक्तिमत्व,कुलगुरू,महत्त्व,प्रतीक,प्रतिमा,ललित,उज्ज्वल,तत्त्व,ब्रह्म,विनंती,आशीर्वाद,वास्तुशांती,भूमिपूजन,वसतिगृह,शासकीय,भगवद्गीता,साहजिक,परिषद,शिबिर,मंदिर.
 सामान्यपणे आढळणाऱ्या काही शब्दांतील लेखनदोष दूर व्हावे म्हणून निवडक शुद्ध शब्द:सत्त्व,परीक्षा,पडीत,मथिथार्थ,की,तत्कालिक,केंद्रित,अधीक्षक,पृष्ठ,कृत्रिम दिलगिरी,उणीवा,कवयित्री,प्रीत्यर्थ,कोट्यवधी,जादा,पीकपाणी,निष्क्रीय इत्यादी.
 या काही शब्दांचा लेखनात केवळ दुर्लक्षामुळे दोष निर्माण होतात.ते लक्ष दिल्यानेच दूर होतील.शब्दा-शब्दांचा प्रत्येक वेळी थांबून,शुद्धलेखनाचा विचार आपण केला पाहिजे.

मराठी शुद्धलेखन संदर्भात प्रश्नावली (पूर्व तयारी पाहण्यासाठी)

१) मराठी शुद्धलेखनाचे एकूण नियम किती? (संख्या सांगा.)
२) मराठी साहित्य महामंडळाने पुरस्कृत केलेल्या नियमांना कोणत्या वर्षी महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली?
३)परसवर्ण कोणत्या प्रकारच्या शब्दासाठी योजावा.
४) गद्य-पद्य उतारे कोणत्या लेखकांच्या पासून मराठी महामंडळाच्या शुद्ध लेखनास अनुसरून लिहावेत?
५) खालील पैकी कोणता शब्द शुद्ध आहे?

उदा. गीतांजली, गितांजली



२८...