पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/34

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





आपल्या साध्या, सरळ तत्वज्ञान आणी आचाराने सांगीतलेली आहे. विठलाची भक्ति, नाम भजनाचे महात्म्य भुत-मात्रातच भगवंताचे अधीष्ठान मानून त्यांच्यावरिल प्रेम 'नाचू किर्तनाचे रंगी, ज्ञानदिप लावू जगी. हि प्रतीज्ञा लौकीक प्रतीष्ठा जातीभेद विसरून अध्यात्मीक पातळीवरील लोकशाही एकात्मता हि या वारकरी पंथांस खास वैशीष्ट्ये आहे.
अ) शुद्ध उतारा १ - वारकरी पंथ हा महाराष्ट्रातील एक अत्यंत लोकप्रिय पंथ आजही आहे आणि पूर्वीही होता. अपार भक्ती आणि उत्कट प्रीती या पंथात आपल्या साध्या सरळ तत्त्वज्ञान आणि आचाराने सांगितलेली आहे. विठ्ठलाबद्दलची भक्ती, नामभजनाचे माहात्म्य भूतमात्रातच भगवंताचे अधिष्ठान मानून त्यांच्यावरील प्रेम, 'नाचू कीर्तनाचे रंगी। ज्ञानदीप लावूजगी।' ही प्रतिज्ञा, लौकिक, प्रतिष्ठा, जातिभेद विसरून आध्यात्मिक पातळीवरील लोकशाही एकात्मता ही या वारकरी पंथाची खास वैशिष्ट्ये आहेत.
आ) अशुद्ध उतारा २ - यादवापूर्विच्या साम्राजात कर्नाटक माहाराष्ट्रा या दोन प्रांताच्या सिमारेषा अगदिच अस्पष्ट होत्या. त्यामध्ये सलोख्याचे नाते होते असे आढळते. परस्पराना हे प्रांत अपरीचीत नव्हते. यादवकाळात मात्र महाराष्ट्र आणी मराठि भाषा संस्कृति अस्मीता नव्याने रूप धारण करताना दिसते. म्हणुनच महाराष्ट्राच्या सांस्कृतीक ईतीहासात यादवकाळाला महत्वपुर्ण स्थान आहे!

आ) शुद्ध उतारा २ - यादवांपूर्वीच्या साम्राज्यात कर्नाटक-महाराष्ट्र या दोन प्रांतांच्या सीमारेषा अगदीच अस्पष्ट होत्या. त्यांमध्ये सलोख्याचे नाते होते असे आढळते. परस्परांना हे प्रांत अपरिचित नव्हते. यादवकालात मात्र महाराष्ट्र आणि मराठी भाषा, संस्कृती, अस्मिता नव्याने रूप धारण करतांना दिसते. म्हणूनच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात यादवकालाला महत्त्वपूर्ण स्थान आहे.



३१...