पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/36

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी




ग) ज्ञानेश्वर-एकनाथ-तुकाराम रामदास इ. अनेक संत महाराष्ट्रात होऊन गेले.
ग) ज्ञानेश्वर, एकनाथ, तुकाराम, रामदास इ. अनेक संत महाराष्ट्रात होऊन गेले.
घ) मी म्हणालो सरिता नीट अभ्यास कर
घ) मी म्हणालो, “सरिता, नीट अभ्यास कर".
च) राजनारायण यांचे उपोषण कधी सुटणार.
च) राजनारायण यांचे उपोषण कधी सुटणार?
छ) अहाहा? किती सुंदर दृश्य हे?
छ) "अहाहा! किती सुंदर दृश्य हे!"
ज) हाय रे देवा, काय घात हा?
ज) “हाय रे देवा!! काय घात हा !!
झ) 'तू येशील, मी त्याला विचारले.'

झ) 'तू येशील?' मी त्याला विचारले.



३३...