पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/38

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





 आ) आवाहनात्मक संबोधन दाखवितांनाही हे स्वल्पविराम (,) चिह्न दिले जाते.उदा : विवेक, खेळायला जा, विदुला, अभ्यास कर, विश्वजित, शाळेत जा.
४) अपूर्ण विराम (:)
 अ) वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा झाल्यास अपूर्ण विराम (:) हे चिह्न वापरतात. उदा : पुढील क्रमांकाच्या विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या : १०, ५०
 आ) दोन सुट्या, वेगवेगळ्या कल्पना किंवा स्वतंत्र विचार अनुबंधांसह मांडावयाचे झाल्यास अपूर्ण विराम (:) हे चिह्न वापरतात. उदा. मराठी कथा : एक दृष्टिक्षेप
५) प्रश्नचिह्न (?)
 ज्यात प्रश्न विचारला आहे अशा वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थक (?) हे चिन्ह वापरतात.
उदा. तू अभ्यास केलास?
६) उद्गार चिह्न (!)
 भावना व्यक्त करतांना ती दर्शविणाऱ्या शब्दांच्या शेवटी उद्गारवाचक (!) हे चिह्न योजितात. उदा. अरेरे ! तिचे वर्ष वाया गेले.
शाबास ! प्रथम पारितोषिक मिळविलेस.
७) अवतरण चिह्न ('....') व ("....")

 अ) प्रत्यक्ष बोलणाऱ्यांच्या तोंडचे शब्द दर्शविण्यासाठी अवतरण चिह्न("....") योजितात.उदा. ती म्हणाली “मी नक्की पास होईन."



३५...