पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/40

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





१०) कंस ()
 एखाद्या गोष्टीचे स्पष्टीकरण किंवा खुलासा देण्यासाठी कंस गोलाकार (....) किंवा चौकोनी [ ] किंवा महिरपी { } हे चिह्न योजितात.
 उदा. : बाजीप्रभूने (शिवाजीमहाराजांचा साथीदार) विलक्षण पराक्रम गाजविला. चौकोनी किंवा महिरपी कंस गरजेनुसार भिन्नतादर्शक म्हणून योजावेत.
११) विग्रह चिह्न (-)
 दोन शब्दातील किंवा वस्तूतील वेगळेपण दाखविण्यासाठी विग्रह (-) हे चिह्न वापरतात.
 उदा. अर्जुन धनुष्य-बाण घेऊन सज्ज झाला.
१२) दंड चिह्न (|)
 चरणपूर्तीसाठी काव्यात पूर्णविरामाच्या ऐवजी दंड (1) हे चिह्न वापरतात.
 उदा. महाराष्ट्र धर्म वाढवावा ।
१३) अवग्रह (ऽ)
 एखाद्यास्वराचे उच्चारणातील दीर्घत्व दर्शविण्यासाठी अवग्रह (ऽ) चिह्न वापरतात. उदा. : आऽई, अगाऽई, ओऽऽ इत्यादी.
१४) टिंब टिंब (... ...)
 वाक्यात गाळलेली जागा दर्शविण्यासाठी टिंब टिंब (... ...) या चिह्नाचा उपयोग करतात.

 उदा. : लालबहादूर शास्त्री भारताचे ... ... होते.



३७...