पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/41

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





१५) अपशब्द नोंद (xxx)
 अश्लील,असभ्य, अपशब्द अथवा शिवी नोंदवता येत नाही. त्याऐवजी फुल्या जेवढी अक्षरे असतील तेवढ्या येतात. उदा. : जो मर्द आहे तो युद्धाला सामोरे जातो. पण जो (XX) आहे, तो पळून जातो.
१६) पुढे तपशील देणे (:-)
 उदा. : सत्कर्म केव्हाही चांगले :- परोपकार करा,दान धर्म करा.
१७) किंवा, वा पर्यायसूचकता, अनुबंध/विकल्प चिन्ह ('/')
 पर्याय अथवा अनुबंध ('/') या चिह्नाने सूचित होतो. उदा. मी / तू जावे. येथे मी किंवा तू जावे असे सूचित केले आहे. किंवा अनुबंध, ५/क, व्यंकटेश अपार्टमेंट, नवी पेठ, पुणे ३०, येथे क मधील ५ क्रमांकाची सदनिका हा अनुबंध दर्शविला आहे.
१८) वरील प्रमाणे - जसेच्या तसे. '--'.
 उदा. : प्रगती -"- या चिह्नाने वरीलप्रमाणे 'प्रगती' हा शब्द पुन्हा नोंदविला जातो.
१९) अधोरेखा (____)
२०) काकपद (ᚳ )

२१) एकेरी दंड (1)



३८...