पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/42

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी




२२) दुहेरी दंड (||)
■ तात्पर्य, विराम चिह्न म्हणजे वाक्याचे भाग करून त्यातला अर्थ समजण्यासाठी समाविष्ट केलेल्या ह्या खुणा आहे. 'ईश्वराची माझ्यावर कृपा आहे.' अशा सरळ वाक्यात पोट विभाग नसल्यामुळे त्यात चिरामचिह्ने घालण्याची गरज नाही. मात्र एका सरळ वाक्यात दुसरे वाक्य किंवा वाक्यांग समाविष्ट असले तर स्वल्प विराम चिह्न द्यावे लागते. उदा. : एक तरुण गुराखी, तीन-चार गायी, बरोबर घेऊन चरावयाला नेत होता. ■ दोन-तीन सरळ वाक्य मिळून जेव्हा मोठे वाक्य होते. त्यावेळेस स्वल्पविराम चिह्न दिले पाहिजे. एक मुलगी रडकुंडीला आली होती, तिने मैत्रिणीला विनंती केली की, मला तुझी पुस्तके अभ्यासाला दे.
■ एकाच प्रकारचे दोनपेक्षा अधिक शब्द आले म्हणजे त्या प्रत्येक शब्दापुढे स्वल्पविराम चिह्न द्यावे. आमचे महाविद्यालय जुने, भव्य आणि अग्रगण्य आहे.
■ वाक्याच्या सुरुवातीला ‘संबोधन' आले असता त्याच्यापुढे आणि मध्येच 'संबोधन' आले असता त्याच्या पुढे स्वल्पविराम चिह्न द्यावे. उदा. : स्वामी, मी आपला सेवक आहे, प्रधान म्हणाला, महाराज, माझे म्हणणे ऐका.
■ आणि, तर, परंतु इत्यादी अव्ययांच्या मागे स्वल्पविराम चिह्न पाहिजे.
■ 'की' याअव्ययानंतरहीस्वल्पविराम द्यावा लागतो. जी वाक्ये निरनिराळी आहेत, त्या निरनिराळ्या वाक्यांच्या किंवा वाक्यांगाच्या मध्ये अर्ध विरामचिह्न द्यावे. उदा. काठावर राहणारे तसेच राहतात; परंतु उडी मारणाऱ्याला रत्न मिळतात.
■ आता पुन्हा तुम्ही विचारू नका; कारणआता पुन्हा तुम्हाला मी संधी देणार नाही. असे काही नियम स्थूलमानाने उदाहरणांच्या आधारे विरामचिह्नांबाबत तयार करता येतील.

■ ■ ■



३९...