पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/45

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





३) अभि
 '(अधिक) अभिनंदन, अभिलाष (जवळ) अभिमुख, अभिनय (पुढे) अभिमान, अभ्युदय' 'अभि' याउपसर्गाने 'कडे' हा अर्थ दाखविला जातो. इंद्रम अभिगच्छति म्हणजे इंद्राकडे जातो. कधी कधी 'अभि' या उपसर्गाचा वेगळाच अर्थ होतो. उदा. अस्तु म्हणजे असो; 'अभ्यस्तु'. अभि'याने अनुकूल अर्थ दाखविला जातो. उदा. अभिमान अभि'उपसर्ग सारखेपणा, सानिध्य, वेगळेपणा दर्शविण्यासाठी योजतात.
४) प्रति
 'प्रति' या उपसर्गाने प्रतिकूल (उलट), अर्थ होतो. प्रतिकूल, प्रतिचा (एकेक) प्रतिदिन, प्रतिवर्ष, (प्रत्येक) असा अर्थ दाखविला जातो. उदा. अप्रति हा शब्द अव्यय किंवा विशेषण आहे. त्याचा अर्थ शत्रूला पुन्हा तोंड वर काढता येत नाही. प्रतिशोध, प्रतिमान, प्रतिकार, प्रतिवादी, प्रत्येकी, एकेकाला, विरुद्ध, परत, मागे, साठी, करीता, स्थान, सारखा, तुल्यबळ असे या उपसर्गाचे विविध अर्थ होतात.
५) अति सु

 या उपसर्गांनी शब्द ‘पूर्ण' होतात. 'सु' याचा अर्थ सोपे, उत्तम असा आहे. तर 'अति'चे उदा. अतिधन म्हणजे ज्याच्याजवळ पुष्कळ धन आहे असा. (सोपे)'सु' याचा दुसरा अर्थ सुकर असाही होतो. उदा. सुलभ, सुजाता, सुगम, सुभाषित, सुबोध, सुकृत, सुग्रास, (अधिक) सुशोभित, सुस्वागतम, सुशिक्षित इत्यादी (चांगला) असाही 'सु' चा अर्थ होतो. उदा. सुजन म्हणजे सज्जन, सुशील म्हणजे चांगल्या आचरणाचा, सुधारणा अति, याचा एक अर्थ 'ओलांडणे' असाही आहे. अति म्हणजे अधिक्य होय. 'अति' याचा अतिशय, वर्चस्व, जोर असेही अर्थ होतात. उदा. अतिसार, अतिशहाणा, अतिक्रम, अतिरेक, अत्यंत



४२...