पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/47

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





संसर्ग, संगम, संभाषण, संयोग, संकीर्ण, सम्यक, संग्रह, (चांगले) : संस्कृत, संस्कार, संगीत.
१०) वि
 वि (अभाव) विफल, विधवा, विसंगती याचा अर्थ सम च्याउलट होतो. वि+एति किंवा अप+एति म्हणजे वेगळा होतो. 'वि' म्हणजे (विशेष) विजय, विख्यात, विनंती, विवाद आणि अप म्हणजे योग्यतेने कमी, उलट (विरुद्ध) अपकार, (खाली येणे) अपकर्ष, अपमान, 'वि' या उपसर्गाने वियोग (उदा. विघटन) प्रतिकूलता (विमनस्क) भेद (विभाग) विरुद्ध (विलोम) असे अर्थ सूचित होतात.
११) अनु
 अनु म्हणजे (मागून) येणे, अनुयायी, अनुभव, अनुक्रम, अनुताप, अनुज किंवा (प्रमाणे) उदा. अनुमोदन, अनुकरण.
१२) उप
 उप म्हणजे (जवळ) उपवास, उपकार, उपनिषद (गौण) उपाध्यक्ष, उपदिशा, उपग्रह, उपवेद, उपकुलगुरू.
१३) परि
 परि (भोवती) उदा. पर्यटन (पूर्ण), परिणाम, परिपूर्ण. उदा. : परिमित, परिश्रम, परिवार
१४) अधि

 अधि (मुख्य) अधिपति, अध्यक्ष, (वर) अध्ययन, अध्यापन



४४..