पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/49

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





मराठीतील 'वाक्य-विचार'

 भाषेच्या अभ्यासकाला व्याकरण म्हणजे काय आणि व्याकरणात कोणकोणत्या गोष्टीचा अंतर्भाव होतो याविषयी अगदी स्थूल परंतु पूर्ण व स्पष्ट कल्पना असली पाहिजे. भाषा आणि व्याकरण, शब्द, वाक्य आणि पद, धातु आणि क्रियापद, सर्वनाम, विशेषण, सव्यय आणि अव्यय, क्रियेचा कर्ता, क्रियेचे कर्म, वाक्याची रचना, वाक्य विवेचन, वाक्यविचार इ. विषयांचे अध्ययन आणि विवेचन केले पाहिजे.
 'मनातील गोष्ट दुसऱ्यास कळविण्याचा जो उपाय त्याला भाषा' म्हणतात.'
 (मराठी ग्रामर बुक-१ व्याकरण पुस्तक पहिले : ना. वि. आपटे, १९१४) लोकांच्या बोलण्याचा अभ्यास करुनच भाषेचे नियम ठरतात. 'हेमंत गेली', 'गौरी जातो', बैल मरला', 'पुस्तक विकला' असे आपण बोललो तर ते चुकले, पण का? कुठे? कसे चुकले? हे सांगण्यासाठी व्याकरण आहे. भाषेचे नियम ज्या शास्त्रात दिलेले असतात त्याला व्याकरण म्हणतात.
 बोलणाऱ्याच्या मनातील एक विचार पूर्णपणे समजण्यासाठी जे बोलावे लागते, त्याला वाक्य म्हणतात. 'पक्षी उडाला' हे वाक्य आहे. नुसते 'पक्षी गावून' म्हटल्याने वाक्य पूर्ण होत नाही.
 बोलताना आपण एक वा अनेक वाक्य बोलतो. त्यालाच भाषा म्हणतात. वाक्याचे अर्थ असलेले उच्चारलेले भाग म्हणजेच शब्द होय. एकच विचार समाविष्ट असलेली काही वाक्ये असतात. उदा. : पक्षी उडाला. फूल उमलले. पाणी तापले. यात एकेकच विचार आहे. 'पक्षी उडाला आणि फांदी मोडली'. 'जो विद्यार्थी मनापासून अभ्यास करतो तो परीक्षेत पास होतो' आणि लोक त्याचा गौरव करतात. अशीही अनेक विचार एकत्र गुंफलेली वाक्येही असतात.

 वाक्यविचार हा व्याकरण्याचा अत्यंत महत्त्वाचा भाग बनतो. कारण वाक्यावाक्यांची



४६...