पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/50

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मराठी लेखनशुद्धी मिळूनच भाषा बनते. आपण वाक्यात ज्याच्या विषयी बोलतो त्याला उद्देश म्हणतात आणि उद्देशाविषयी जे बोलतो, त्याला विधेय म्हणतात. उदा. : पक्षी उडाला यात पक्षी' हा एक भाग आणि उडाला' हा दुसरा भाग. पाऊस गेला. यात 'पाऊस' आणि पावसाविषयी जे बोलायचे ते म्हणजे गेला' असे दोन भाग होतात. पक्षी' हे उद्देश आणि 'उडाला' हे विधेय. 'पाऊस' हे उद्देश आणि 'गेला' हे विधेय. उद्देश आणि विधेय हे वाक्याचे दोन मुख्य भाग आहेत. मोठ्या वाक्यांचे उद्देश आणि विधेय हे भाग अनेक शब्द मिळून झालेले असतात. उदा. गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीजवळ आहे. यात १) गोदावरी नदीचा उगम हे उद्देश आणि त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी जवळ आहे हे विधेय असून ते अनेक शब्दांचे आहे. येथे 'उगम' हे मूळ उद्देश असून 'गोदावरी नदीचा' हे शब्द मूळ उद्देशाचा अर्थ वाढवितात. आणि 'आहे' हे मूळ विधेय असून त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरीजवळ' हे शब्द विधेयाचा अर्थ वाढवितात. मूळ उद्देश व मूळ विधेय यांचा अर्थ वाढविणारे शब्द त्यांचा अर्थाचा विस्तार करतात म्हणून त्यांना अनुक्रमे उद्देश्य-विस्तारक आणि विधेयविस्तारक असे म्हणतात. तेव्हा उद्देशाचे दोन भाग १) उद्देश आणि २) उद्देश विस्तारक त्याचप्रमाणे विधेयाचेही दोन भाग १) विधेय २) विधेय विस्तारक होत. अनु. उद्देश विधेय मूळ उद्देश उद्देश विस्तारक मूळ विधेय विधेय विस्तारक कर्ता (कर्म व कर्म विस्तार) क्रियापद १ उगम गोदावरी नदीचा आहे त्र्यंबकेश्वर येथील ब्रह्मगिरी जवळ २ कोळसा दगडी सापडतो खाणीत ४७... . - - -