पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/52

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





वाक्याची फोड करण्याची एक पद्धत आहे. वाक्य विवेचन ही वाक्याची फोड करण्याची दुसरी पद्धत आहे. वाक्यरचना सांगणे म्हणजे वाक्यातील कर्ता, कर्म आणि क्रियापद सांगणे. पदघटना सांगणे म्हणजे वाक्यातील प्रत्येक शब्दाचा मूळ शब्द, त्याची जाती इ. व्याकरण सांगणे. वाक्यरचना, पदघटना आणि वाक्यातील शब्दांचा परस्पर संबंध या ३ गोष्टी मिळून वाक्य विवेचन होते. या वाक्य विवेचनात वाक्यरचना कशी झाली ते व वाक्यातील प्रत्येक शब्दाचा स्वतंत्र विचारही असतो. वाक्य पृथकरण व वाक्यविवेचन या दोन्ही पद्धती सारख्याच महत्त्वाच्या व आवश्यक आहेत. वाक्य रचनेच्या दोन पद्धती व वाक्याची फोड करण्याच्या दोन पद्धती मिळून वाक्यविचार होतो. वाक्य पृथकरणात मुख्यत्वे अर्थाचा विचार असतो. आणि वाक्य विवेचनात मुख्यत्वे पदघटनेचा विचार असतो.
 वाक्यांचे क्रियापदाच्या अर्थावरुन १) स्वार्थ, २) आज्ञार्थ, ३) विध्यर्थ, ४) संकेतार्थ असे प्रकार होतात आणि १) विधानार्थी, २) प्रश्नार्थी, ३) उद्गारार्थी, ४) होकारार्थी/ करणरूपी, ५) नकारार्थी/अकरणरूपी असे वाक्यांचे प्रकार होतात.
 एका वाक्यात किती विधाने असतात त्यावरुन वाक्याचे तीन प्रकार मानले जातात.
 १) केवळ वाक्य किंवा शुद्ध वाक्य :
 अ) गायबगळा, सिलोन व ब्रह्मदेशात आढळतो.
 ब) गाडगीळ समिती प्रमुख होते.
 क) लेखकाचे केस काळे होते.
 ड) रावबहाद्दरांना नमस्काराचे वेड होते.
 इ) मी बगळ्यांचा थवा पाहिला.
 ई) आम्ही जातो आमुच्या गावा.
 ए) तानाजी लढता लढता मेला.

 ज्या वाक्यात एकच उद्देश्य व एकच विधेय असते त्याला केवल वा शुद्ध वाक्य



४९...