पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/54

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी




हे अर्थ व्यक्त करण्यास असमर्थ वाक्ये आहेत. २) आकांक्षा म्हणजे दोन्ही पदे परस्परांशी पूरक बनून अर्थ प्रदान करण्यास सिद्ध असतात.३) सान्निध्य! अर्थबोध होण्यासाठी दोन पदे एकत्र येतात. उदा. 'आसचि' म्हणजे जवळपणा, औषध न लगे मजला आणि नल गे मजला, वाक्यातील पदे योग्यता, आकांक्षा यांनी युक्त असले तरी पदांचे उच्चारण एका पाठोपाठ झाले नाही तर वाक्याचा अर्थ श्रोत्यांना कळणार नाही. म्हणून सन्निधी म्हणजे वाक्यातील पदांचे उच्चारण एका पाठोपाठ करणे योग्य असते.

(मो. के. दामले - पान नं. ११७)


 आकांक्षायोग्यता आणि सन्निधी यांची वाक्याच्या अर्थबोध होण्यासाठी आवश्यकता असते.
 'वाक्य-संस्याद योग्यताकाङ्क्षासत्ति युक्तः पदोच्चयः।'
 असे विश्वनाथाने साहित्यदर्पण मध्ये नमूद केलेले आहे.
 "प्रा. ना. ग. देशपांडे यांना तर वाक्यपृथकरण या प्रकरणाची आवश्यकता मराठीत आहे असे वाटत नाही" कारण पदपरिस्फोटाने हे काम भागते असे त्यांचे मत आहे.

(मो. के. दामले, पान नं. १२३)

■ ■ ■



५१...