पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/8

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





ऋणनिर्देश


 'मराठी शुद्धलेखनाचा मार्ग दाखविणारे माझे पुस्तक छोटेखानी स्वरुपाचे होते तरी त्याला अनेकांचे हातभार लागलेले आहेत.त्या सर्वांचे मनापासून आभार मानणे माझे कर्तव्य मी मानतो. नाशिकचे व्यासंगी विद्वान डॉ. व्यं. गं. उपाख्य राजाभाऊ गायधनी यांचे मार्गदर्शन शुद्धलेखनाचेकामीसतत लाभत आलेले आहे.त्यांनी संहिता काळजीपूर्वक तपासून चर्चा केली.शिवाय बहुमोल प्रस्तावनाही लिहून दिली,त्याबद्दलचे ऋणशब्दातीत आहे.त्याचप्रमाणे डॉ. ह. कि. तोडमल,डॉ. बा. वा. दातार,बाळासाहेब सराफ यांनीही मुद्रित प्रत पाहून काही सूचना केल्या होत्या.आदरणीय डॉ. मो. स. गोसावी यांनी या लेखनाला प्रारंभापासूनच प्रोत्साहन दिले,त्याबद्दल मी कृतज्ञ आहे.मराठी लेखनशुद्धी' या नव्या पुस्तकाचे मुद्रक सुविधा प्रिंटर्स यांनी हे अत्यंत किचकट काम स्वीकारून काटेकोरपणे पूर्ण केले.या सर्वांचा मी मन:पूर्वक आभारी आहे.
 आज मराठी शुद्धलेखनाची प्रत्यक्षात काय स्थिती गती आहे,हे आपण जाणता आहात.त्यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही.आता खरी गरज आहे ती शुद्ध लेखन, भाषा शुद्धी समजून घेण्याची.तेच या पुस्तक निर्मितीचे प्रयोजन आहे.
 या विषयावरील बरीच पुस्तके उपलब्ध आहेत.तथापि याची आणखी काय आवश्यकता होती,हे आमचे पुस्तक वाचल्यावरच उलगडेल.अत्यंत सोप्या पद्धतीने येथे मराठी शुद्धलेखनाचे नियम तर समजावून दिलेले आहेतच,शिवाय भरपूर उदाहरणे देऊन त्यांची चर्चा केली आहे,स्पष्टीकरणे दिलेली आहेत. केवळ सराव करण्याची,शुद्धलेखनाची भीती घालवण्याची आवश्यकता आहे. आपल्याला कोणतीही शंका असल्यास लगेच विचारावी त्याचा संकोच बाळगू नये.त्यासाठी चलभाष/दूरभाष वापरावा.
 मराठी वाचक, विद्यार्थिवर्ग, शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, मुद्रण-शोधक, विविध