पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/83

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मराठी लेखनशुद्धी इंग्रजीच्या एका शब्दातही मराठीत अनेक अर्थ/छटा असू शकतात. उदा. Release . - मोकळे करणे, सोडून देणे, प्रकाशित करणे, बंधमुक्त करणे, सुटका, मुक्तता, प्रकाशन, सोडचिठ्ठी त्यासाठी सुयोग्य सुलभ मराठी प्रतिशब्द योजावा. मराठी भाषा शब्दसमृद्धीला त्याचे साहाय्य होईल.