पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/84

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मराठी लेखनशुद्धी मराठी भाषेची कौशल्ये मराठी मातृभाषा आहे. तथापि सुसंवादासाठी भाषांच्या कौशल्यांना आत्मसात करणे गरजेचे आहे. आपले विचार, अनुभव आणि भावना परस्परांत व्यक्त करण्याचे भाषा एक महत्त्वपूर्ण साधन आहे. एकमेकांना समजून घेणे हे भाषेचे मूलभूत कार्य आहे. भाषा विनिमयाचे साधन आहे. वैचारिक आदान-प्रदानाबरोबरच ज्ञान संपादनाचे माध्यम म्हणून भाषा उपयुक्त ठरते. मानवी मूल्यांचा संस्कार हे भाषेचे अंगभूत कार्य असल्यामुळे तिचे कलात्मक रूपही जोपासणे आवश्यक आहे. भाषेच्या जडणघडणीतून माणसाच्या संभाषण आणि लेखनात प्रगल्भता येऊन व्यक्तिमत्व विकास होतो. मानवी जीवनाच्या व्यापकतेचीजाणीव आणि आत्मिक विकास या गोष्टीभाषेच्या माध्यमातून साधता येतात. ज्ञान विज्ञानाबरोबरच चिंतनशीलतेचा विकास होऊन कलासम्पन्न जीवनांची सुविकसीत परंपरा निर्माण होण्यास भाषेचा अभ्यास अत्यंत उपयुक्त ठरतो. भाषा उत्तम आत्मसात केल्याने माणसातील सुप्त शक्तीला चालना मिळते. कला निर्मितीच्या प्रेरणेला आपण भाषा जाणकार झाल्याने प्रोत्साहन मिळते. श्रवण, संभाषण, वाचन, लेखन, आकलन, स्वलेखन आणि स्वतंत्र अभिव्यक्तिक्षमता व कौशल्ये भाषेवरील प्रभुत्व संपादनात कारणीभूत ठरतात. त्यांचा सर्वतोपरीने विकास परिश्रमपूर्वक करावा. . . .