पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/87

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मराठी लेखन-शुद्धी: 'मराठी लेखन-शुद्धी' हे डॉ. भास्कर गिरिधारी यांनी लिहिलेले छोटेसे पण व्याकरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त व अभ्यासपूर्ण पुस्तक आहे. हे पुस्तक सर्वसामान्य विद्यार्थ्यांपासून ते मराठी प्राध्यापकांपर्यंत सर्वांना उपयुक्त ठरणार आहे. तसेच स्पर्धा परीक्षांसाठी याची उपयुक्तता आहे. प्रस्तुत मराठी लेखन-शुद्धी हे पुस्तक विपुल उदाहरणांमुळे सोपे झाले आहे. कित्येकदा जाणकारांकडून देखील शुद्धलेखनाच्या चुका होतात. अशा बारीक सारीक चुका टाळण्याच्यादृष्टीने हे पुस्तक उत्तम आहे. व्याकरणाच्या पुस्तकात एक प्रकारचा जो बोजडपणा असतो तो यात कोठेही आढळत नाही. केवळ एखादे दुसरे उदाहरण देऊन अवघड नियमांची जंत्री असेल तर बोजडपणा वाढतो. याबाबतीत हे पुस्तक अपवाद आहे. शुद्धलेखनाची अवघड नियमावली अत्यंत सोप्या शब्दात सांगून विपुल उदाहरणे दिलेली आहेत. काही लक्षणीय शब्दाचा निधी, शब्दसिद्धी प्रकरण, मुद्रणशोधन, विरामचिन्हांचा अभ्यास, उपसर्ग विचार यांची जोड देऊन हस्व, इकार व उकार अशी अनेक उदाहरणे दिलेली आहेत. त्यात निवडक अशुद्ध शब्दांचे शुद्ध रूप, मराठी शुद्धलेखन स्वाध्याय असे उपयुक्त विवेचन आहे. शिवाय निवडक, उपयुक्त आणि दुर्मिळ पारिभाषिक शब्द (इंग्रजीला प्रतिशब्द) दिलेले Suvidha : 9326575775 आहेत. ISBN : 978-93-80744-20-9 गौतमी प्रकाशन मूल्य ६० रुपये 9"789380"744209॥