पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/9

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





भाषांचे अभ्यासक-संशोधक यांना या सुलभ शुद्धलेखन मार्गदर्शनाचा निश्चितच उपयोग होणार आहे. ते तो करून घेतील याची खात्री आहे. तोच या मराठी लेखनशुद्धी'ला प्रतिसाद म्हणून प्रेरक ठरणार आहे. त्याबद्दल त्यांचेही आभार.
 मित्रांनो, मला शुद्धलेखन पूर्ण समजले आहे या भ्रमात आता कोणीही राहू नये, अगदी मराठी विषयात पीएच.डी. करणारे आणि त्यांचे प्रबंध तपासणारे यांनीही. हे एक कटू सत्य नाईलाजाने नमूद करावे लागत आहे. या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत जाणून घ्यावे, त्यांच्याशी चर्चा करुनच मराठी शुद्धलेखनाचा मार्ग गवसेल. मला ज्या अभ्यास वाङ्मयाचा संदर्भ म्हणून उपयोग झाला त्यांचा उल्लेख केला आहे. त्या लेखकांचा मी ऋणी आहे.
 त्याचप्रमाणे प्रस्तुत पुस्तकाचे मुखपृष्ठ व मुद्रण सुविधा प्रिंटर्स यांनी तयार करुन दिले आहे, तसेच आयएसबीएन नंबरसह गौतमी प्रकाशन यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले याबद्दल गौतमी प्रकाशन यांचाही मी आभारी आहे.

डॉ. भास्कर गिरिधारी

०६...