पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१०२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८३ )

नारायणपाल वगैरे या घराण्यांतील राजे गादीवर आले, या राजघराण्याचे अमलांत बंगाल प्रांताची राज्यव्यवस्था सेन या नांवाच्या ब्राह्मण घराण्याकडे सोपविण्यात आली होती; धर्मपालानंतर पाल घराण्याची राजसत्ता हळु हळु कमकुवत होत चालली होती; पुढें इ. सन. १०९५ च्या सुमारास सेन घरा- ण्यांतील विजयसेन या नांवाच्या एका शूर पुरुषाने पाल घराण्याची बंगाल प्रांतावरील सत्ता नामशेष करून तो प्रांत स्वतः बळकाविला व तेथें आपल्या सेन घराण्याची स्थापना केली;

 कलिंग गजाचा सरदार सामंतदेव ( अथवा सामंतसेन यानें दक्षिणे- तून येऊन बंगाल प्रांतांतील मयूरभंज संस्थानांतील काशीपुरी अथवा सांप्र- त काशियारी ( काशिभारी ) येथे एक लहानसें राज्य स्थापन केलें होतें; या सामंतसेनाचा विजयसेन हा नातू होता; त्याने पाल घराण्याच्या कारकीर्दी- तील पाटणा हैं राजधानीचे शहर बदलून नडिया उर्फ नदिया है आपल्या राज- धानीचे ठिकाण केले; विजयसेनानंतर त्याचा मुलगा बल्लाळसेन द्दा अधिकारा- रूढ झाला; तो जातिविषयक व धर्मविषयक भेदाभेद व मतमतांतरें समस- मान दृष्टीने पाहणारा असून त्यानें ब्राह्मण व कायस्थ वगैरे जातींत कुलीन सांप्रदाय सुरू केला, आणि मगध, भूतान, चितगांग, आराकान, ओरिसा व नेपाळ वगैरे प्रांतात ब्राह्मण उपदेशक पाठविले. सेन घराण्याने बंगाल प्रांताची सत्ता आपल्या हातांत घेतल्या वेळेपासूनच पाल घराण्याच्या सत्तेस पूर्ण ओहोटी लागत चालली होती. आणि पंचवीस वर्षांच्या आंतच, म्हणजे इ० सन १११९ .मध्ये विजयसेनाचा नातू लक्ष्मणदेव याने तिरहुत किंवा सर्व उत्तर बहार प्रति पाल राज्यकर्त्यापासून आपल्या ताब्यांत घेतला, त्यामुळे ते घराणे आतां नामशेष होऊन गेलें होतें; या सेन घराण्याकडे बंगाल व उत्तर बहार प्रांताची सत्ता अजमासे ऐंशी वर्षे टिकली; त्यानंतर ६० सन १९९९ मध्यें महमद घोरी याचा प्रसिद्ध सरदार बखत्यार खिलजी यानें बंगाल व बिहार या दोन्हींही प्रांतांवर स्वारी करून व ते हस्तगत करून मुसलमानी सत्तेखालीं आणिले, व अशा रीतीने पाल व सेन हीं दोन्हीं राजघराणी नामशेष झालों+


 + या बाबतीत थोडीशी निराळी हकीकतही इतरत्र आढळून येते, ती अशी कीं, इ० सन १९९३ च्या सुमारास कुतुबुद्दीनचा सेनापती महमंद यानें विहार