पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१०३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८४ )

 दुसन्या गुप्त घराण्याचा लोप झाल्यानंतर उत्तर हिंदुस्थानांत दोन प्रबळ राज्य अस्तित्वांत होती; ( इ० सन ७८३ ) त्यापैकी एकाची राजधानी कनोज व दुसन्याची उज्जयनी हीं शहरें होतीं; उजयनी येथे गुर्जवं रशीय वत्स- राजा राज्य करीत होता. हे गुर्जर लोक हूण लोकांबरोबरच हिंदुस्थानांत आले असावे, असा तर्क आहे; याच गुर्जर वंशांतील ज्या पुरुषांनीं कनोज येथे राज्य- केलें, त्यांना तोमार घराण्यांतील राज्यकर्ते अशी संज्ञा अहि. हे राज्य इ० सनः ८४३ च्या सुमारास वत्सराजाचा नातू भोजराज पहिला यानें जिंकून आपल्या


प्रांत घेतला व त्याच्याच पुढील वर्षी नडिया हैं शहरही त्यानें आपल्या हस्त- गत करून घेतले; यावेळीं बिहार प्रांताच्या गादीवर इंद्रद्युम्न या नांवाचा राजा असून महंमदानें बिहारचा किल्ला हस्तगत केल्यानंतर तेथे पुष्कळ टूट मिळविली, तेथील मुंडण केलेल्या सर्व संन्याशांची कत्तल उडविली, आणि अशाच प्रकारचे इतरही अनेक अत्याचार केले, बिहार प्रांत काबीज केल्यानंतर पुढील वर्षी त्यानें बंगाल प्रांतावर स्वारी केली; त्यावेळी आपले सर्व सैन्य मागे ठेवून तो फक्त अलग घोडेस्वामीनि नुदिया उर्फ नडिया या राजधानीच्या शहरांत ' आला; महमुदाबरोबर सैन्य सरंजाम नसल्यामुळे तो कोणी सौदागर (घोड्याचा व्यापारो) असावा, असें समजून, तो थेट राजवाड्याच्या दरवाजाशी येऊन. दाखल झाला तरी, त्याचा कोणी तपास केला नाहीं; त्यानंतर दरवाज्यांतून आत प्रवेश केल्याबरोबर त्यानें आपल्या लोकांसह तरवारी बाहेर काढल्या, आणि वाड्यांतील लोकांवर ते सर्व मोठ्या आवेशानं तुटून पडले; त्यावेळीं राजा लक्ष्मणनेन उर्फ लखमणिया ( अथवा लक्ष्मण) हा जेवत बसला होता;- त्याला मुसलमानांच्या वा हलवाची बातमी कळतंच तो तसाच जेवणं टाकून वाड्याच्या मागील दरवाजाने अनवाणीच पळाला. त्यामुळे राजवाडा भायतांच महंमदाच्या हस्तगत झाला व त्याच्या राण्या, दासदासी, इतर स्त्रिया, नौकर- चाकर, खजिना व भरभक्कम जडजवाहीर मुसलमानांच्या हातीं सांपडलें; व अशा रीतीने त्यांचा ह्या प्रांतावर अंमल मुरू झाला.
 लक्ष्मणसेन हा मोठा न्यायी, व उदार असून गीतगोविंद ग्रंथाचा कर्ता जयदेव कवी याच्या राज्यांत व कारकीर्दीत होऊन गेला; लक्ष्मणसेनाचे अखेरचे. दिवस मोठ्या आपत्तीत व अज्ञातांत गेले: महमदाच्या हल्ल्याच्या वेळीं तो: पळून जगन्नाथपुरी येथे जाऊन राहिला, आणि तेथेच तो अखेरीस मृत्यू पावला !!