पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/११४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ९५ )

ब्रिटिश सरकाराशी तह केला, आणि त्या तहाअन्वये नेपाळ संस्थानच्या हद्दीच्या पश्चिम सरहद्दीपासून तो तहत सतलज नदीपर्यंत पसरणाऱ्या आसपासच्या अरण्यमय प्रदेशांसुद्धां वायव्येकडील सर्व लांबलचक पट्टी इंग्लिशांच्या ताब्यांत 'आली; म्हणजे रोहिलखंड व वायव्येकडील प्रांत यांचे वरील बाजूस थेट यमुना नदीपर्यंत पसरलेला सर्व डोंगराळ प्रदेश हिंदुस्थानच्या अगदीं लगत असलेल्या हिमालय पर्वताच्या रांगांच्या पायथ्याशी लागून असलेला निम्न देशीय व - मौल्यवान अरण्यभाग- ब्रिटिश सरकारच्या ताब्यात आला. हिमालय पर्वतांतील हे प्रदेश इंग्लिशांच्या तात्र्यांत आल्यामुळे हिंदुस्थान सरकारच्या राष्ट्रप्रदेशाची सीमा हिंदुस्थान आणि तिबेट, अथवा क्याथे, हीं एकमेकांपासून अलग कर- -णाऱ्या अत्युच्च पर्वताच्या म्हणजे हिमालय पर्वताच्या जलोत्सर्ग पठरापर्यंत, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन धडकली. चीनचे सरकार हे फार पूर्वीपासून ब्रिटिश सर- कारच्या हालचालीने अत्यंत बारकाईने आणि कळकळीनें निरीक्षण करोत होर्ते; आणि ह्या वेळेपासूनच ब्रिटिश राष्ट्राची सरहद्द चीनच्या राष्ट्राच्या सरहद्दीशीं •जाऊन मिडलेली आहे. अशा रीतीनें नेपाळचे गुरखे सरदार ब्रिटिश सरकारच्या अत्यंत मौल्यवान प्रदेशाच्या वरच्या बाजूस असलेल्या डोंगराळ प्रदेशाच्या अरुंद पट्टीमध्येच जरी या वेळेपासून खिळले गेले, आणि जरी त्या देशांत . कित्येक अंतर्गत क्रांत्याही घडून आल्या तरीही त्यांनी लष्करी वर्चस्वाची आपली - पद्धत आजपर्यंत तशीच कायम ठेवली आहे; व शिस्त ठेवून आणि बाहेरून शस्त्रास्त्रांचा पुरवठा करून घेऊन युरोपियन पद्धतीवर आपली सैन्य तयार कर- ण्याचे धोरणही त्यांनी आतांपर्यंत त्याचप्रमाणें नेटाने चालू ठेविलेले आहे. तथापि ३० सन १८१६ पासून, हाणजे इंग्रजाबरोबरील त्यांचे युद्ध समात झाले त्यावेळेपासून त्यांनी ब्रिटिश सरकाराला कधींही त्रास दिला नाहीं, व इंग्लि- शांनीही त्यांच्या संबंधांत आजपर्यंत केव्हांही ढवळाढवळ केली नाहीं. नेपाळचे लहानसे राज्य, है हिंदुस्थान आणि चीन या दोन मोठ्याल्या राष्ट्रांमध्ये एखाद्या चिपेसारखे असून ( लायल साहेबाच्या म्हण्य प्रमाणें ) उभयतांपैकी कोणालाही आडकाठी मोडून टाकण्याची कोणत्याही प्रकारें बिलकूल इच्छा नाहीं.
 गुरखे लोक हे बांध्याने सडपातळ, टेंगणे परंतु शरिरार्ने कसलेले व मज. 'बूत असतात; ने गळची राजधानी काठमांडू है शहर असून या ठिकाणी गुरखे लोक'ची विशेष वस्ती आहे. हे बहुतेक लष्करी पंघाचे असून इंग्रज सैन्यति