पान:मराठ्यांचा इतिहास भाग १.pdf/१३२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

( ११३ ) गोविंद [ चवथा ] याने त्याला पदभ्रष्ट करून स्वतः राजगादी बळकाविली; [[इ०सन ९१७] हा ही राज्यकर्ता बराच उदार व शूर होता, अशी त्याची ख्याती आहे. त्यास प्रभूत वर्ष, व सुवर्ण वर्ष, अशीं दुसरींही दोन नांवें होतों: हा मोठा शंकर भक्त असून त्याने अनेक शिवालयें बाधिलीं, व वेंगी येथील चालुक्य 'राज्यकही त्याने अनेक युद्ध प्रसंग केले; चवथ्या गोविंदाच्या पाठी मागून त्याचा चुलता, म्हणजे चगत्तुंगाचा दुसरा मुलगा बगहा, [इ सन ९३२ ते इ. सन ९४० ) त्यानंतर त्याचे दोन मुलगे कृष्णराज व खोटिक, व त्यानंतर ककल हे अनुक्रमे गादीवर आले; तथापि अमोव वर्षाच्या मृत्यू- नंतरच्या काळापासूनच या राज्यास उतरती कळा लागण्यास प्रारंभ झाला ● होता व हे घराणे खोटिक याच्या कारकीर्दीच्या अखेर पर्यंत ( इ. सन १६५ ते इ. सन ९७१) कसे तरी जीव धरून जिवंत राहिले होते परंतु ककलच्या कारकर्दीत इ. सन ९७३ मध्ये उत्तरकाचीन चालुक्य वशांतील राजा दुसरा तैलप याने देवगिरी येथील यादव उर्फ जाधव राज्यकर्त्यांच्या मदतीने, य, च्या- वर स्वारी करून, त्यास पदभ्रष्ट के; व राष्ट्रकूट घराण्याचा शेवट करून त्या ठिकाणी आer चालुक्य घराण्याची पुन्हां स्थापना केली. या राष्ट्रकूट घराण्याने इ. सन ७५३ पासून इ. सन ९७३ पर्यंत, म्हणजे २२० वर्षे महाराष्ट्रा वर राज्य केले; त्यानंतर या घराण्याचा लोप होऊन “ चालुक्य हे घराणे महाराष्ट्र देशाचे अधिपती बनले.


 राष्ट्रकूट घराण्याला नामशेष करून ज्या काळात तेल यानें महाराष्ट्रांत आपल्या चालुक्य घराण्याची सत्ता स्थापन केली, त्याच काळाच्या सुमारास गुजराथेंतील अनहिल पट्टा उर्फ पाटण येथील चावडा कुळातील शेवटचा भोजराजा याच्या कन्येशी साळुंखे उर्फ चालुक्य घराण्यातील राज्यकर्ता मूळराज यान विवाह करून तेथे आपल्या घराण्याची गादी स्थापन केली हा मूळराज कल्याण येथील जयसिंह चालुक्याचा मुलगा होता; पहा महाराष्ट्राचा राजा झाल्यावर त्याने चोक व चेदी वगैरे राज्यकर्त्यांबरोबर युद्ध प्रसंग रू त्याना पूर्णपणे जेरीस आणले होते; पुढे त्यानं आपल्या बाप या नांवाच्या एका सेनानायकास मूळराजावर स्वारी करण्यात पाठविले होते; परंतु तींत त्याच्या सैन्याचा पराभव होऊन त्यास माघार घेणे भाग पडले होते; त्यानंतर